प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) वर दुख:चा डोंगर कोसळला आहे. गौतमीच्या वडिलांचे निधन (Gautami Patil father died) झाले आहे. काही दिवसांपुर्वी ते धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले होतो. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी रात्रीच्या सुमारास त्यांचं निधन झालं.
[read_also content=”इस्रोनं सौर मोहीमेबद्दल दिली अपडेट, आदित्य एल1ने यशस्वीपणे बदलली पृथ्वीची दुसरी कक्षा! https://www.navarashtra.com/india/isro-solar-mission-update-aditya-l1-successfully-changed-earth-second-orbit-nrps-453748.html”]
तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काही दिवसापुर्वी तिचे वडील रवींद्र बाबुराव नेरपगारे पाटील धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले होते. त्यानंतर काही सामजिक कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालायत दाखलही केले होते. ही बाब गौतमीला माहिती होताच तिने वडिलांना पुण्यातील एका रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसापासून उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्यी मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पुण्यातील धनकवडी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गौतमी पाटीलचे आई-वडील एकमेकांपासून वेगळे झाले असून गौतमी तिच्या आईसोबत राहते. गौतमी पाटील चांगलीत चर्तेत आल्यानंतर काही दिवसांपूर्वी तिचे वडील माध्यमांवर झळकले होते. त्यांनतर गौतमीचे वडील रविंद्र पाटील हे धुळ्यात मरणासन्नावस्थेत आढळले होते. धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना उपचारासाठी हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. खिशात असलेल्या आधार कार्डवरुन ते गौतमी पाटीलचे वडील असल्याचं समोर आलं होते. त्यानंतर सोशल मिडियावर अनेकांनी गौतमीला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. मात्र, तिने तिच्या वडिलांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या दोन्ही किडण्या आणि लिव्हर देखील निकामी झालं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांच निधन झालं.