जगातील सर्वात मोठा मेगा फॅशन इव्हेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट गालाला (MET Gala 2024) 6 मेपासून सुरूवात झाली आहे. न्यूयार्कमधील मेट्रोपॅालिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये या इव्हेंटच भव्य उद्घाटन झालं. या शोमध्ये जगभरतील अनेक स्टार्स उपस्थिती लावत आहेत. भारताकडून आलिया व्यतिरिक्त देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतीची मुलगी ईशा अंबानीही या शोमध्ये सहभागी झाली आहे. आलियाच्या देसी लूकनं सगळ्यांना भुरळ पाडली आहेच आता या शोमधून ईशा अंबानीचाही लूक (Isha Ambani Look In MET Gala) समोर आला आहे. साधेपणासोबत ट्रेंडी लूक करत ईशा लाईमलाईटमध्ये आली आहे.
[read_also content=”मेट गाला 2024 मध्ये आलियाचा देसी लूक, सब्यासाचीच्या फिक्कट हिरव्या साडीत रेड कार्पेटवर जणू उतरली अप्सरा! https://www.navarashtra.com/movies/alia-bhatt-met-gala-2024-first-look-goes-viral-on-internet-nrps-530490.html”]