साऊथचा सुपरस्टार सूर्या (Suriya सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कंगुवा'(Kanguva) मुळे चर्चेत आहे. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सुर्यासोबत बॉबी देओल (Bobby Deol) आणि दिशा पटानी (Disha Patani) मुख्य भूमिकेत आहेत. नुकतचं या चित्रपटाचा टीझरही रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमध्ये सूर्या आणि बॉबी देओलची दमदार स्टाइल पाहायला मिळत आहे.
[read_also content=”नागराज मंजुळेचं ओटीटी विश्वात पदार्पण, ‘मटका किंग’ वेबसीरीजची घोषणा; बॉलिवूडचा प्रसिद्द अभिनेता झळकणार! https://www.navarashtra.com/movies/nagraj-manjule-ott-debut-by-hindi-web-series-matka-king-on-amazon-prime-video-nrps-516779.html”]
शिवा हा साऊथ स्टार सूर्याच्या कांगुवा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहे. तर बॉबी देओल एका भयानक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्टनुसार, जवळजवळ दोन वर्षांच्या तीव्र शूटिंग आणि प्री-प्रॉडक्शननंतर, चित्रपट आता पोस्ट-प्रॉडक्शन टप्प्यात आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुर्याने नुकतेच या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी डबिंग सुरू केले आहे. अॅनिमल नंतर अभिनेता बॅाबी देओल पुन्हा एकदा खलनायकाच्या भुमिकेत दिसत आहे. वेढलेले लांब आणि घाणेरड्या केस असलेल्या अवतारात तो दिसत आहे, तर सुर्याची भेदक नजरही खुप काही सांगून जाते. हे दोघांनाही एकत्र पाहण्यास चाहते चांगलेच उत्सुक आहेत.
मंगळवारी ‘कांगुवा’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज केला. यापूर्वी हा चित्रपट एप्रिल 2024 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र, आता आगामी निवडणुकांमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. आता या चित्रपट वर्षाच्या शेवटी रिलिज होण्याची शक्यता आहे.