(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
टेलिव्हिजन अभिनेता नकुल मेहता यांचे घर आनंदाने भरून गेले आहे. अभिनेत्याच्या पत्नीने एका बाळ मुलीला जन्म दिला आहे. यासोबतच नकुल दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. ही माहिती एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे अभिनेत्याने स्वतः दिली आहे. यामध्ये नकुलने कुटुंबाचा आनंद सुंदरपणे व्यक्त केला आहे. तसेच अभिनेत्याला तो पुन्हा एकदा बाबा झाल्यामुळे चाहते त्याच अभिनंदन करत आहेत.
नकुलने एक सुंदर पोस्ट केली शेअर
नकुलने आपल्या नवजात मुलीसोबत घालवलेल्या सुंदर क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, आणि सुंदर कॅप्शन देखील दिले आहेत. अभिनेत्याने लिहिले, “ती आली आहे. सुफीला अखेर तिची रुमी सापडली आहे. आमची हृदये पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट २०२५. तुमचे काम प्रेम शोधणे नाही, तर तुमच्या आत असलेल्या सर्व अडथळ्यांना शोधणे आहे जे तुमच्यासमोर उभे आहेत.”
एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी
तीन फोटोमध्ये दिसली नकुलची झलक
नकुलने त्याच्या इन्स्टाग्रामवर तीन फोटो शेअर केली आहेत आणि एक सुंदर कॅप्शन देखील दिले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये पहिला फोटो त्याचा मुलगा सुफीचा आहे, ज्यामध्ये तो त्याच्या धाकट्या बहिणीला मांडीवर घेतलेला दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, नकुल नवजात मुलीच्या पाळण्याजवळ बसला आहे. बाळ पाळण्यात आहे आणि नकुल डोळे मिटून तिच्याजवळ बसला आहे. त्याच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रार्थना स्पष्टपणे दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये, नकुल आणि त्याची पत्नी जानकी हसत सेल्फी काढत आहेत. हा फोटो मुलीच्या जन्मापूर्वी काढण्यात आला आहे.
नकुल आणि जानकी यांचे २०१२ मध्ये झाले लग्न
नकुलने या वर्षाच्या सुरुवातीला त्याची पत्नी जानकीच्या गरोदरपणाची माहिती दिली होती आणि ही आनंदाची बातमी ऐकताच चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. नकुल आणि जानकी यांचे जानेवारी २०१२ मध्ये लग्न झाले. त्यांना एक मुलगा देखील आहे. आता १३ वर्षांच्या लग्नानंतर हे जोडपे दुसऱ्यांदा एका गोंडस मुलीचे पालक झाले आहे.
नकुल टीव्हीच्या आवडत्या कलाकारांपैकी एक अभिनेता
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नकुल मेहता हा टेलिव्हिजनवरील सर्वात आवडत्या स्टार्सपैकी एक आहे. तो ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’, ‘इश्कबाज’, ‘दिल बोले ओबेरॉय’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ सारख्या टेलिव्हिजन शोमध्ये मुख्य भूमिकेत दिसला आहे. नकुलचा चाहता वर्ग देखील जास्त आहे. तसेच आता अभिनेता दुसऱ्यांदा बाबा झाल्यामुळे चाहते खूप खुश आहेत.