फोटो सौजन्य - सोशल मीडिया
खतरो के खिलाडी सिझन १४ : खतरो के खिलाडी सिझन १४ सध्या प्रचंड चर्चेत आहे. आजपासून या सीझनच्या फिनालेची सुरुवात होणार आहे. शोचा फिनाले २८ आणि २९ सप्टेंबर रोजी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. यामध्ये सध्या टॉप पाच स्पर्धक हे स्पर्धेमध्ये अजूनही टिकून आहेत. अभिषेक कुमार, कृष्णा श्रॉफ, शालीन भानोत, गश्मीर महाजनी आणि करणवीर मेहरा या स्पर्धकांचा समावेश आहे. रविवारच्या भागामध्ये विजेता घोषित केला जाणार आहे, या शोची ट्रॉफी जिंकणारा शेवटचा कोण होता हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. या शोच्या फिनालेमध्ये आलीया भट्ट सुद्धा चित्रपट प्रमोशनासाठी सहभागी झाली होती. आता या खतरो के खिलाडी सिझन १४ चा विनरचे नाव समोर आले आहे. जाणून घ्या कोणी जिंकले हे विजेतेपद…
खतरो के खिलाडी सिझन १४ दमदार कलाकार स्पर्धक सहभागी झाले होते, या सीझनमध्ये बरेच कमी खेळाडूंनी स्टंट अबोर्ट केले आहेत. रिॲलिटी शोशी संबंधित अपडेट्स देत ट्विटर पेज द खबरीने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विजेत्याचे नावही समोर आले आहे. वास्तविक शालीन भानोत, गश्मीर महाजनी, अभिषेक कुमार, करणवीर मेहरा आणि कृष्णा श्रॉफ टॉप ५ मध्ये पोहोचले. आता मिळालेल्या बातमीनुसार, करणवीर मेहराने चार खेळाडूंना मागे टाकत शोची ट्रॉफी जिंकली आहे. ‘द खबरी’च्या ताज्या रिपोर्टनुसार, करणवीर मेहराने ‘खतरों के खिलाडी १४’ चा विजेता ठरला आहे.
EXCLUSIVE #KaranVeerMehra is the winner of #KhatronKeKhiladi14 pic.twitter.com/qvxfV6r9Qi
— The Khabri (@TheKhabriTweets) September 27, 2024
करणवीर मेहरा हा या सीझनचा एक मजबूत खेळाडू होता. त्याने या सीझनमध्ये सगळे स्टंट कमालीचे केले होते. खेळाडूंसाठी तो नेहमीच कडवा प्रतिस्पर्धी राहिला आहे. एवढेच नाही तर करणवीरला शोमध्ये सर्वात कमी भीतीचा सापळा मिळाला. या बातमीने अभिनेत्याचे चाहते खूप खूश दिसत आहेत. अजुनपर्यत यासंदर्भात टेलिकास्ट झाले नाही परंतु खबरीच्या माहितीनुसार करणवीर शोचा विजेता ठरला आहे.