रणवीर सिंग हा नेहमीच त्याच्या एनर्जीमुळे आणि त्याच्या दमदार भूमिकांमुळे ओळखला जातो. क्रिती सॅनॉन ही बॉलीवूडमधील सुंदर अदाकारा आहे. रणवीर सिंग आणि क्रिती सेनन ही बॉलिवूडची प्रसिद्ध नावं आहेत. यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. मुंबईत आलिशान जीवनशैली जगणाऱ्या या स्टार्सनी रविवारी वाराणसीच्या घाटावर रॅम्प वॉक केला. या व्हिडीओच कौतुक सोशल मीडियावर होत आहे. बनारसी विणकाम कौशल्य जगभर पोहोचवण्यासाठी रणवीर आणि क्रिती यांनी नमो घाट येथे फॅशन शो तयार केला. या शोची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
काशीमध्ये रणवीर-क्रितीचा रॅम्प वॉक रविवारी रणवीर सिंग आणि क्रिती सेनन यांचा काशी विश्वनाथला भेट देणारा फोटो समोर आला. आता या स्टार्सचे नमो घाटावर रॅम्प वॉक करतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. इंडियन मायनॉरिटी फाउंडेशनच्या ‘धरोहर काशी की’ या दोन दिवसीय कार्यक्रमात मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये रणवीर आणि क्रितीने रॅम्प वॉक केला. बनारसच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणे ही त्याची थीम होती. रणवीर सिंगने तपकिरी रंगाचे बनारसी ब्रोकेड परिधान करून बनारसी संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले. तर क्रिती सेननने मरून रंगाची घागरा चोली परिधान केली होती. हा एक प्रकारचा नववधूचा पोशाख आहे, परंतु कपड्यांमध्ये काशीची झलक कायम राहावी म्हणून साध्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे. हे पोशाख तयार करण्यासाठी सहा महिने लागले.
#WATCH | Varanasi, Uttar Pradesh: Actress Kriti Sanon and actor Ranveer Singh participate in a fashion show curated by Indian Fashion Designer Manish Malhotra on the theme ‘Banarasi Saree- A tapestry of Indian culture & Craftsmen’ pic.twitter.com/eaR7CLehJR
— ANI (@ANI) April 14, 2024
बनारसमध्ये रणवीर सिंगने रॅम्प वॉक शोचे वर्णन मुंबईच्या 5 स्टार हॉलमध्ये झालेल्या शोपेक्षा चांगले आहे असे त्याने सांगितले. यावेळी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले. यावेळी तो म्हणाला की, “श्री नरेंद्र मोदी यांनी विणकर समुदायाचे संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी जे काही केले आहे त्याचे आम्ही कौतुक करतो… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 10 वर्षांत काशीचा कायापालट केला आहे. काशी आपल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करते. आम्हाला आमच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि वारशाचा खूप अभिमान आहे.” असे रणवीर म्हणाला.