Mandakini Daughter Is Her Copy Rabje Inaya Photos Viral Fans Amazed
अभिनेत्री मंदाकिनी तिच्या पहिल्याच चित्रपटातून स्टार बनली. या चित्रपटात तिने राज कपूर यांच्यासोबत काम केले आणि पहिल्याच चित्रपटाने तिला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं. इतर अभिनेत्रींप्रमाणे मंदाकिनीला बॉलिवूडमध्ये फारसा संघर्ष करावा लागला नाही. १९८५ मध्ये आलेल्या ‘राम तेरी गंगा मैली’चित्रपटात तिने राजीव कपूरसोबत स्क्रीन शेअर केली हो ती. या चित्रपटातील तिचा साधाभोळा पण, तितकाच मादक अंदाज अनेकांची मनं जिंकून गेला. विशेष म्हणजे या चित्रपटातील मंदाकिनीचं एक गाण प्रचंड हिट झालं होतं.
या चित्रपटामुळे मंदाकिनी एका रात्रीत स्टार बनली. नंतर ती अनेक चित्रपटांमध्येही दिसली. त्यातील काही चित्रपट हिट झाले तर काही फ्लॉप झाले. ‘राम तेरी गंगा मैली’चित्रपटानंतर मंदाकिनीने जवळपास ६ वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम केले. पण नंतर अचानक मंदाकिनी गायब झाली. पण ती करियरच्या शिखरावर असताना तिने स्वतःला चित्रपटांपासून दूर ठेवले आणि लग्न केले. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. २६ वर्षांनंतर, मंदाकिनी पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आली. मंदाकिनीची दोन्हीही मुलं आता मोठी झाली आहेत.
अभिनेत्री आपल्या मुलासोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती, तर तिची सून बुशराही फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. ती एक निर्माती असून नेटफ्लिक्ससाठी कंटेंट तयार करते. पण आज आपण मंदाकिनीच्या सुनेबद्दल नाही तर, तिच्या मुलीबद्दल बोलत आहोत. मंदाकिनीची मुलगी आता मोठी झाली आहे आणि दिसण्यातही ती तिच्या आईसारखीच दिसत आहे. मंदाकिनीनच्या मुलीचे नाव रब्जे इनाया ठाकूर आहे. राब्जेचा फोटो पाहून कोणीही म्हणू शकेल की ती तिच्या आईचीच ड्युब्लिकेट आहे. राब्जे सध्या शिक्षण घेत असून ती अनेकदा तिच्या आई, वहिनी बुशरा आणि भाऊ राबिलसोबतच्या फोटोंमध्ये दिसते.
‘राम तेरी गंगा मैली’चित्रपटानंतर मंदाकिनीने ‘डान्स डान्स’, ‘लडाई’, ‘कहाँ है कानून’, ‘नाग नागिन’, ‘प्यार के नाम कुर्बानी’, ‘प्यार करके देखो’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मंदाकिनी शेवटची १९९६ मध्ये रिलीज झालेल्या ‘जॉर्डर’ चित्रपटात दिसली होती. तिच्यासोबत चित्रपटात गोविंदा, आदित्य पंचोली आणि नीलम कोठारी मुख्य भूमिकेत होते.