मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. सध्या ‘फसक्लास दाभाडे’ मुळे चर्चेत राहणारी सध्या मितालीने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोज शेअर केले आहेत. सध्या तिने शेअर केलेल्या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे.
Mitali Mayekar Photos

मराठमोळी प्रसिद्ध सिने आणि मालिका अभिनेत्री मिताली मयेकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कायमच तिच्या फॅशनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होते.

सध्या ‘फसक्लास दाभाडे’मुळे चर्चेत राहिलेली मिताली चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तिने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खास लूक करत फोटोशूट केले आहे.

रेड कलरची काठापदराची साडी नेसून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर हटके फोटो पोजेस देत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दागिने वेअर करत एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्रीने हा स्पेशल लूक चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी केला होता. तिच्या फॅशनचे चाहते कौतुक करत असून तिच्या लूकची ही जोरदार चर्चा होत आहे. मितालीने हे फोटोशूट निसर्गाच्या सान्निध्यात केले आहे.

मिताली मयेकरने शेअर केलेल्या फोटोंमधील सौंदर्य आणि निसर्गातील हिरवळ खूपच सुंदर दिसते. चाहत्यांकडून फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.






