(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध मराठी टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस फेम अक्षय वाघमारेने चाहत्यांना आनंदची बातमी दिली आहे. अक्षय वाघमारे आता लवकरच बाबा होता आहे. अक्षयची बायको आणि अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी प्रेग्नंट असून दोघे लवकरच आई बाबा होणार आहेत. योगिताच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. अक्षयने डोहाळे जेवणातील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आणि चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटी त्यांचे अभिनंदन करत आहेत.
‘सीझन 2’ असं म्हणत अभिनेता अक्षय वाघमारेने सोशल मीडियावर योगिताच्या डोहाळे जेवणाचा फोटो शेअर केला आहे. योगिता आणि अक्षय दोघेही यावेळी आनंदी दिसत आहेत. त्यांच्या आनंदाचं आणखी एक कारण म्हणजे दोघांच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे. योगिता आणि अक्षय दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत. यामुळे ते दोघेही खूप खुश आहे.
अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी या दोघांनी २०२१९ मध्ये लग्न केले. कोरोना आणि लॉकडाऊन असल्याने त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करून एकमेकांचे जोडीदार झाले. लग्नाच्या एका वर्षात दोघांना कन्या रत्न प्राप्त झाले. आता लग्नाच्या सहा वर्षांनी अक्षय आणि योगिता दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. तसेच आता यावेळी त्यांचा आनंद दुप्पट वाढला आहे.
५० दिवसांचा यशस्वी प्रवास! ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाने थिएटरमध्ये गाठला सुवर्ण टप्पा
अक्षय वाघमारेच्या कामाबद्दल सांगायचं झाले तर, त्याने आतापर्यंत ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘ती फुलराणी’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘बस स्टॉप’, ‘दोस्तीगिरी’, ‘खुर्ची’ सारख्या मालिका आणि सिनेमात काम केलं आहे. तसेच अभिनेता बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये सहभागी झाला होता मात्र पहिल्याच आठवड्यात त्याला घराबाहेर जावे लागले. तर योगिता अरुण गवळीबद्दल सांगायचं झाल्यास, तिने राजकारणात एन्ट्री घेतली आहे. योगिता यंदाच्या MBC निवडणूका लढवणार असल्याची माहिती काही महिन्यांआधी समोर आली आहे.






