(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठीचा स्पर्धक आणि मराठी अभिनेता पुष्कर जोग सध्या चर्चेत आहे. अभिनेत्याचा नुकताच ‘ह्युमन कोकेन’ हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची अभिनेत्याने काही दिवसांपूर्वीच घोषणा केली. सिनेमातील कलाकारांचे खतरनाक लूक देखील निर्मात्यांनी रिव्हिल केले. जे पाहून चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांमधील उत्सुकता वाढली. पुष्करने आता सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने आता UAE मध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे.
फिनाले आधीच Bigg Boss 19 च्या विजेत्यांचे नाव आले समोर, ही बघा TOP 5 फायनलिस्टची यादी
पुष्करचा अचानक भारत सोडून UAE ला शिफ्ट होण्याचा निर्णय ऐकून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. काहींनी त्याला ट्रोल देखील करण्याचा प्रयत्न केला आहे. तर काहींनी त्याच्या या निर्णयाचं कौतुक केले आहे. पुष्करने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “आज मला माझा गोल्डन व्हिसा मिळाला. आता मी अधिकृतपणे UAE चा रहिवासी झालो आहे. हे सगळं माझ्या मुलीसाठी, तिच्या आनंदासाठी आणि कल्याणासाठी आहे, तिच्या भविष्यासाठी. धन्यवाद आई-बाबा, धन्यवाद डॉ. अमोल सुहास जोग आणि गॉड. आभारी आहे.” असे लिहून अभिनेत्याने आता भारत सोडून जाण्याचे संदेश दिले आहे.
तसेच, मिळालेल्या माहितीनुसार, पुष्कर गेली अनेक महिने विदेशात त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे. त्याने अनेक सिनेमे हे विदेशात शूट करण्यात आले आहेत. त्याचा आगामी ह्युमन कोकेन हा चित्रपट देखील युनायटेड किंगडममध्ये शूट करण्यात आला आहे. पुष्करचा ‘ह्युमन कोकेन’ हा चित्रपट येत्या १६ जानेवारी २०२६ मध्ये संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अभिनेत्याचे चाहते उत्सुक आहेत. तसेच या चित्रपटामध्ये एका नव्या भूमिकेत पुष्कर झळकणार आहे.
उद्योगपती वेदांत बिर्ला अडकला लग्नबंधनात, दीर्घकालीन मैत्रीण तेजल कुलकर्णीशी केले लग्न
या चित्रपटाबद्दल सांगताना पुष्कर म्हणाला, ”’ह्युमन कोकेन’ हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक चित्रपट आहे. या पात्रात शिरण्यासाठी मी मानसिक आणि शारीरिक तयारीसोबत बऱ्याच कार्यशाळा केल्या. एका गुन्हेगारी जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीचा अंतर्गत संघर्ष समजून घेणं अजिबात सोपं नव्हतं.” असे तो म्हणाला.
पुष्करचं सोशल मिडिया हँडल चेक केलं तर तो गेली काही वर्ष त्याच्या फॅमिलीसह दुबईत राहत असल्याचं दिसत आहे. Golden Visa UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती सरकारने (UAE Government) सुरू केलेली एक विशेष निवासी योजना आहे. गोल्डन व्हिसाच्या माध्यमातून दुसऱ्या देशातून आलेल्या नागरिकांना UAE मध्ये दीर्घकालीन राहण्याची परवानगी मिळते. ही परवानगी ५- १० वर्षांसाठी असते.






