(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांचे विचार अगदी स्पष्टपणे समाजासमोर मांडताना दिसतात. हे कलाकार सामाजिक भान तर जपतातच परंतु ते समाजात प्रति फारच संवेदनशीलही असतात. तसेच काही कलाकार जातीय भेदभाव स्त्री पुरुष समानता यावरही स्पष्टपणे बोलताना दिसतात. आणि आता याचमुळे मराठमोळी अभिनेत्री चिन्मयी सुमित या चर्चेत आल्या आहेत. अभिनेत्री एका कार्यक्रमादरम्यान होय मी जय भीम वाली आहे असे रोग तक भाष्य करत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पाईक आहे असे म्हणताना दिसली आहे. आता अभिनेत्री या विधानामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली असून, सगळीकडे तुझीच चर्चा सुरू आहे.
जय जय स्वामी समर्थ; स्त्रीशक्ती, भक्ती आणि चमत्कार यांचा संगम असलेला विशेष आठवडा!
लोकांनी अभिनेत्रीला विचारले प्रश्न?
नुकताच काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात अखिल भारतीय जनवारी संघटनेच्या वतीने तेरावे महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते या अधिवेशनात अभिनेत्रीची देखील उपस्थित लाभली होती. आणि याच वेळी अभिनेत्रीने म्हटले होते की मी नमस्कार म्हटल्यानंतर लगेचच जय भीम बोलते त्यामुळे मला लोक विचारतात की तुम्ही जय भीम वाले आहात का? तुम्ही त्यांच्यातला आहात का? या लोकांना मला सांगायचे आहे की होय मी त्यातली आहे म्हणजे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे असे थेट उत्तर चिन्मयी सुमित यांनी दिलेले दिसले आहे.
म्हणूनच बाबासाहेबांशी कृतज्ञता – चिन्मय समित
तसेच पुढे अभिनेत्री म्हणाली, अनेक लोकांना नेते महापुरुष आवडतात. तशीच मी आंबेडकरांची चाहती आहे, असे सांगत भारतातील प्रत्येक भगिनीला जय भीम म्हणावं वाटलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे त्यामुळे ही भावना मी व्यक्त केली आहे. आपण सर्व महिला जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्ता कॉम्रेड आहात. सर्व महिलांना राज्यघटनेने माणसाचा दर्जा दिला आहे. या राज्यघटनेचे घटनाकार बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांबाबतची कृतज्ञता माझ्या प्रत्येक नमस्कारनंतर जप्त व्हावी असे मला वाटते त्यामुळे मी जय भीम म्हणते.’ असे अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी सांगितले आहे.
कोण आहे अभिनेत्री चिन्मय सुमित?
चिन्मयी सुमित या मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यांनी अनेक चित्रपटात मालिकात आणि नाटकांमध्ये काम केले आहे. फास्टर फेणे रुदयनाथ फुलवंती मुरंबा पोर बाजार यांसारखे गाजलेला चित्रपटात ही अभिनेत्री दिसली आहे. तसेच प्रेमा तुझा रंग कसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनसका अशा प्रसिद्ध मालिकांमध्ये अभिनेत्रीने काम केले आहे






