फोटो सौजन्य - Social Media
दातारांच्या घरी गायत्रीचे ग्रहमख होत असताना चौरेंच्या घरी श्रीकांतची मुहूर्तमेढाची विधी संपन्न झाली आहे. श्रीकांत चौरेच्या सोशल मीडिया हँडलवर या विधीचे सुवर्णक्षण टिपण्यात आले आहे. एकंदरीत, दोघांचं लग्न आता उद्यावर आलं आहे त्यामुळे चाहत्यांनीही तयारी करण्यास सुरुवात केली आहे. गायत्रीने काही महिन्यांपूर्वी तिच्या Relationship status बद्दल खुलासा केला होता. त्यानंतर दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आणि आता लग्न अगदी उद्यावर आले आहे.
गायत्रीचा होणारा नवरा नक्की आहे तरी कोण?
अभिनेत्री गायत्री दातारने अगदी काही महिन्यांपूर्वीच श्रीकांत चौरेची ओळख तिच्या चाहत्यांना करून दिली. दोघांची भेट Dating App वर झाली. त्यावेळी गायत्रीने तिची ओळख फक्त “मी गायत्री आहे” इतकीच करून दिली होती. नंतर मैत्री झाली. मैत्री घट्ट झाली, तेव्हा श्रीकांतला गायत्री अभिनेत्री असल्याचे कळले. पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. श्रीकांत IIT Bombay मधून Pass Out आहे. तसेच त्याला Photography चा छंद आहे.
गायत्रीच्या लग्नासाठी तिचे चाहतेमंडळी आतुर आहे. गायत्रीने ‘तुला पाहते रे’, ‘अबीर गुलाल’ तसेच ‘चल भावा सिटीत’ अशा कार्यक्रमांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.






