(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी मनोरंजन विश्वात या वर्षात अनेक जण लग्नबंधनात अडकले आहेत तर येत्या काही दिवसांत विवाहबंधनात अडकणार आहेत. पूजा बिरारी, प्राजक्ता गायकवाड, भाग्यश्री न्हालवे अशा अनेक अभिनेत्रींती अलीकडेच लग्न झाली तर ज्ञानदा रामतीर्थकर, गायत्री दातार या अभिनेत्रींनी नुकतीच सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली आहे. अशातच आणखी एक मराठी अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्रेम व्यक्त केलं आहे. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे जाणून घेऊयात…
अभिनेत्री रेवती लेले ही लवकरत बोहल्यावर चढणार आहे. स्टार प्रवाहच्या कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेत अमृता या खलनायिकेची भूमिका तिने साकारली आहे. अभिनेत्रीने एका हातात गुलाबाची,सुर्यफुलाची फुलं आणि दुसऱ्या हातातील बोटात अंगठी असा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेवटच्या फोटोमध्ये रेवतीच्या बॉयफ्रेंडची झलकही बघायला मिळत आहे. फोटो शेअर करून रेवतीने लिहिले, मी होकार द्यायच्या आधीच माझ्या ह्दयाने होकार दिला आहे. असं खास शब्दांमध्ये अभिनेत्रीने कॅप्शन लिहून प्रेमाची कबुली दिली आहे.
रेवतीने एका फोटोमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याची झलक दाखवली असली तरी तिचा पती नेमका कोण आहे? त्याचं नाव काय आहे? याबद्दल सोशल मीडियावर कोणताही खुलासा केलेला नाही. आता रेवती नवऱ्याचा फेस रिव्हिल कधी करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
“कोण होतीस तू, काय झालीस तू!” या मालिकेतील तिच्या सहकलाकार सुकन्या मोने यांनी या फोटोवर लिहिले, “लबाड खूप-खूप अभिनंदन! आता पार्टी करूया.” त्यासोबतच अभिषेक रहाळकर, मधुरा जोशी, अनघा अतुल, समृद्धी केळकर, गिरीजा प्रभू आणि साक्षी गांधी यांनीही कमेंट्स करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
रेवती याआधी अभिनेता आदिश वैद्यसोबत रिलेशनशिपमध्ये होती, परंतु दोघांचं ब्रेकअप झालं. आता ब्रेकअपनंतर रेवती पुन्हा एकदा प्रेमात आहे. तिचा होणारा बॉयफ्रेंड कोण आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. रेवतीला आपण ‘स्वामिनी’ आणि ‘लग्नाची बेडी’ या मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिले आहे.






