झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात 'पाणी' हा चित्रपट अव्वल स्थानावर आला आहे. या चित्रपटाने या पुरस्कार सोहळ्यात ऐकून 7 पुरस्कार मिळवून आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे याने केले आहे. आदिनाथ कोठारे यांनी पहिल्यांदाच 'पाणी' चित्रपटाद्वारे दिग्दर्शन केले. आणि त्यांच्या या कामाला यश मिळाले. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात ७ पुरस्कार पटकावल्याचा आनंद निर्मात्यांसह चित्रपटामधील कलाकरांना देखील झाला आहे.
आदिनाथ कोठारेच्या पहिल्या वहिल्या दिग्दर्शन असलेल्या 'पाणी' चित्रपटाने पटकावले ७ पुरस्कार (फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
अभिनेता, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांच्या पहिल्या वहिल्या दिग्दर्शित चित्रपट 'पाणी' चित्रपटाने झी चित्र गौरव पुरस्कारात तब्बल ७ पुरस्कार जिंकले असून 'पाणी' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या ‘जलदूता’च्या आयुष्यावर प्रेरित होऊन सत्यघटनेवर आधारित ‘पाणी’ चित्रपट झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात अव्वल ठरला आहे. पाणी ची गोष्ट ही खास ठरली आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेली.
'पाणी' चित्रपटामध्ये आदिनाथने दुहेरी भूमिका साकारून उत्तम काम तर केलं पण अनेक फिल्म फेस्टीवल मध्ये पाणी ने विशेष कौतुक देखील मिळवले आहे. तसेच अभिनेत्याला प्रशंसा मिळाली आहे.
झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात 'पाणी' ने सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन (अनमोल भावे), सर्वोत्कृष्ट पटकथा (नितीन दीक्षित), सर्वोत्कृष्ट गीत (पाणी टायटल ट्रॅक आणि नाचनारा), आदिनाथ कोठारे आणि मनोज यादव सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (गुलराज सिंग), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (आदिनाथ कोठारे), सर्वोत्कृष्ट चित्रपट (पाणी), असे तब्बल ७ पुरस्कार पटकावले आहेत.
मराठी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आदिनाथ कायम प्रयोगशील भूमिका आणि तितकच खास दिग्दर्शन करताना दिसतो. येणाऱ्या काळात आदिनाथ अजून एका नव्या चित्रपटाच दिग्दर्शन करणार असून वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहे.