(फोटो सौजन्य - Instagram)
नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकरने नुकताच तिच्या आईच्या वाढदिवशी एक खास भेट देऊन त्यांना खुश करून टाकले आहे. अभिनेत्रीने तिच्या आईचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला आणि याचा व्हिडिओ तिने सोशल मीडिया वर देखील शेअर केला आहे. आईचा पापराझी व्हिडिओ ते अमृताच्या आईला माहीत असलेला सध्याचा ट्रेंडिंग पुल्ल ओव्हर केक अश्या अनेक गंमतीजमाती तिने या व्हिडिओ मध्ये दाखवल्या आहेत. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच अनेक कलाकारांनी देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रसिद्ध दिग्दर्शक Vikram Sugumaran यांचे धक्कादायक निधन, वयाच्या ४७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
सोशल मीडिया वरून अमृता कायम तिच्या आयुष्यातले खास क्षण शेअर करताना दिसत असते. अमृता सध्या विविध प्रोजेक्ट्स मध्ये कामात व्यस्थ आहे. आणि लवकरच अमृताच्या वैविध्यपूर्ण भूमिका प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. अमृता तिच्या आई सोबत देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर केले आहे. या दोघींच खास आणि तितकच गोड नातं दिसून येत आहे. अमृताने तिच्या आईचा वाढदिवस स्वतःच्या खास अंदाजात साजरा केला आहे.
अमृता खानविलकरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिची आई खूप खुश दिसत आहे. तसेच ती त्यांना जेवणासाठी बाहेर घेऊन जाताना दिसत आहे. आई आणि लेकीचे मजेदार क्षण या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांसह मराठी कलाकारांनी देखील कंमेंट करून शुभेच्छाचा वर्षाव केले आहे. ज्यामध्ये स्वप्नील जोशी, क्रांती रेडकर, अंकिता लोखंडे, मंजिरी ओक आणि आशिष पाटील यांचा समावेश आहे.
‘Housefull 5’ ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली जबरदस्त कमाई, रिलीजआधीच चित्रपटाचे निर्माते मालामाल!
कामाच्या बाबतीत सांगायचं झाला तर, अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच हिंदी वेब सिरीज आणि मराठी गाणी, चित्रपटामध्ये काम केले आहे. अमृताने अनेक प्रोजेक्ट तर केले पण याचबरोबर अभिनेत्रीने मुंबईत स्वतःचे घर देखील घेतले आहे. अभिनेत्रीच हे धाडसी काम पाहून प्रेक्षकांना देखील तिचा अभिमान वाटू लागला. आगामी वर्षात अमृता आता काय काय प्रोजेक्ट्स करणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. अभिनेत्रीचे अनेक नवनवीन चित्रपट आणि प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीस येतील अशी अशा आहे.