हृषिकेश जोशींच्या 'बोलविता धनी'ची जोरदार चर्चा
दोन वेगळ्या भूमिका, ‘बोलविता धनी’ची संकल्पना
क्षितीश दातेने या नाटकात दोन अत्यंत वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तो सांगतो की, “या दोन्ही भूमिका एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. एकाच वेळी दोन वेगळी माणसं एकापाठोपाठ एक उभी करणं हे माझ्यासाठी थोडं आव्हानात्मक आहे.” ‘बोलविता धनी’ या शीर्षकाचा अर्थ नाटकात वेगवेगळ्या पद्धतीने लागतो. क्षितीशच्या मते, “बोलविता धनी म्हणजे बोलणारा किंवा कृती करणारा एक असतो, पण पडद्यामागे राहून त्याला सूचना देणारा दुसराच कोणी असतो.” विशेष म्हणजे, लोकमान्य टिळक किंवा एकनाथ शिंदे यांसारख्या नेतृत्वादी व्यक्तिरेखांच्या तुलनेत या नाटकात त्याची भूमिका कनिष्ठ पदाची आहे, पण अभिनेता म्हणून हेच आव्हान अधिक रंजक असल्याचे तो मानतो.
हृषिकेश जोशींसोबतचा अनुभव
हृषिकेश जोशींसोबत काम करण्याच्या अनुभवावर क्षितीश दाते खूप उत्साही आहे. “मला हृषिकेश जोशींचं लिखाण प्रचंड आवडतं. त्यांची सगळी नाटकं मी पाहिली आहेत. शिवाय सध्या सुरू असलेल्या ‘मी व्हर्सेस मी’ या नाटकातही आम्ही एकत्र काम करतोय. त्यामुळे त्याने मला या नाटकासाठी फोन केला, तेव्हा मी काहीही विचार न करता लगेच हो बोलून टाकलं.” हृषिकेश यांच्या निवडक विनोदी शैलीमुळे हे नाटक सहकुटुंब पाहता येईल असे आहे. क्षितीश म्हणाला की, हृषिकेशने १३ जणांची ही संपूर्ण टीम एकत्र आणली आहे; त्यांची कलाकार निवडीची पारख खूप चांगली आहे. हे नाटक “कोणाच्याही खिजगणतीत नाही अशा जुन्या नाटकांच्या इतिहासातल्या एका महत्त्वाच्या प्रसंगावरती भाष्य करतं.”
या नाटकात ओंकार कुलकर्णी, संग्राम साळवी यांच्यासह एकूण १३ कलाकार आहेत. १३ जणांना एकत्रित पाहण्याची मजा रसिकांना नक्कीच अनुभवायला मिळेल आणि ‘बोलविता धनी’ हे नाटक नाट्यरसिकांसाठी १०० टक्के पर्वणी असेल, असा विश्वास क्षितीश दातेने व्यक्त केला.
प्रयोगाचे वेळापत्रक
हे देखील वाचा: पोलिसाच्या वर्दीत दिसणार सुबोध भावे, ‘कैरी’ चित्रपटात अभिनेत्याची लक्षवेधी भूमिका!






