(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांचा ‘आरपार’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तरुण मंडळी हा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. हा चित्रपट एका प्रेमळ लव्ह स्टोरीवर आधारित आहे. रोमँटिक कथा असलेल्या या चित्रपटामध्ये ललित आणि ऋता यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना ही नवी जोडी चांगलीच आवडली आहे. या चित्रपटामधील गाणी देखील गाजत आहे. आता अश्याच ‘आरपार’ची चर्चा बॉलीवूडमध्येही होताना दिसत आहे.
चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवालाला मिळाली धमकी, मदतीसाठी पोलिसांकडे तक्रार दाखल
बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपट ‘आरपार’ ला सोशल मीडियावरून खास पाठिंबा दिला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले “चित्रपट थिएटरमध्ये सुरू आहे, नक्की पाहा #आरपार”. असे लिहून अभिनेत्याने या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. तसेच या फोटोमध्ये मध्ये हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर देखील दिसत आहे. राजकुमार राव हा बॉलीवूड मधील अत्यंत मेहनती आणि उत्कृष्ट अभिनेता आहे. त्याने प्रेम चित्रपटामध्ये आपली भूमिका चोख बजावली आहे. अश्यातच हिंदी कलाकारांनी मराठी कलाकारांचे कौतुक करणे आणि त्यांना पाठिंबा देणे ही के मोठी बाब आहे.
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
तसेच राजकुमार राव शेअर केलेल्या पोस्टमध्ये चित्रपटातील प्रमुख कलाकार ललित प्रभाकर, हृता दुर्गुळे आणि दिग्दर्शक गौरव पाटकी यांना टॅग केलं. आणि ही पोस्ट शेअर केली आहे. १२ सप्टेंबर रोजी रिलीज झालेला आरपार हा प्रेम, विश्वास आणि भावनिक संघर्ष यांवर आधारित चित्रपट असून सध्या थिएटर्समध्ये चांगल्या प्रतिसादासह झळकत आहे. राजकुमार राव यांच्यासारख्या लोकप्रिय अभिनेत्याने दिलेल्या या पाठींब्यामुळे चित्रपटाला अधिक व्यापक प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
प्राजक्ता कोळी ‘या’ बहुचर्चित चित्रपटातून करणार मराठीत पदार्पण, स्वतः पोस्ट करत दिली माहिती
sacnilk च्या रिपोर्टनुसार,’आरपार’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने १२ लाख, दुसऱ्या दिवशी १९ लाख, तिसऱ्या दिवशी ७ लाखांची कमाई केली आहे. चित्रपटाचं कलेक्शन हे आता ६७ लाख इतकं झालं आहे. आणि हा आकडा पुढे आणखी वाढण्याची शक्यता आहे. मराठी चित्रपटसृष्टीने गेल्या काही वर्षांत दमदार कथा सांगण्याची परंपरा जपली असून, बॉलीवूडमधील मोठ्या नावांचा पाठिंबा मिळाल्याने ‘आरपार’ सारखे चित्रपट अधिक चर्चेत येत आहेत.