फोटो सौजन्य - इन्टाग्राम
वैविध्यपूर्ण भूमिका साकारून कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे क्षितीश दाते. नाटक असो किंवा चित्रपट अभिनेता नेहमीच अभिनयाची छाप पाडून प्रेक्षकांचं मन जिंकताना दिसतो. आता क्षितीश पुन्हा एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण या भूमिकेचं कारण देखील तितकच खास आहे. मराठी चित्रपट विश्वात प्रेक्षकांची मन जिंकून आता क्षितीश बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.
नाटक, चित्रपट आणि आता हिंदी वेब विश्वात त्यांची दमदार एन्ट्री झाली असून क्षितीशचा हा पहिला बॉलीवूड प्रोजेक्ट आहे त्यामधील त्याचे काम पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. बॉलीवूड मधल्या दिग्गज कलाकारांच्या सोबतीने क्षितीश “मिस्त्री” या वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. यात त्याने पोलिसांची भूमिका साकारली आहे. सोबतीला दिग्गज कलाकार मोना सिंग, राम कपूर देखील या वेबशो मध्ये मुख्य भूमिकेत काम करताना दिसणार आहेत. तसेच ‘मिस्त्री’ वेब सिरीज ही जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. क्षितीशचे पोलीस अधिकाऱ्याचे पात्र नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे. बंटी असे या पात्राचे नाव असून तो पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे.
क्षितीश हा कायम वेगळ्या भूमिका साकारताना दिसला आहे आणि मिस्ट्री मधली त्याची ही भूमिका देखील तितकीच खास आहे. बंटी या भूमिके बद्दल सांगताना क्षितीश म्हणाला की, “आयुष्यात पहिल्यांदा स्क्रीनवर थोड वेगळं पण विनोदी काम कधीच केलं नव्हत आणि सोबतीला खाकी कपडे घालून पोलिसांची भूमिका साकारण्यात देखील एक मज्जा होती. नाटकात, मालिकेत, चित्रपटात एखादी भूमिका साकारताना बॉलीवूड सारख्या एखाद्या वेब शो मध्ये अश्या पद्धतीची भूमिका साकारण्याचा हा पहिला अनुभव असताना बॉलीवूड मधल्या उत्तम सारवलेल्या कलाकारांच्या सोबतीला काम करता येणं हा अनुभव कमालीचा होता.’ असे तो म्हणाला.
तसेच पुढे म्हणाला, ‘खरोखर “मिस्त्री” ची टीम माझ्यासाठी नवीन असली तरी शूट च्या पहिल्या दिवसापासून त्यांनी सगळ्यांनी मला सांभाळून घेऊन आपलंसं होऊन माझ्यासोबत काम केलं आहे. भारतातल्या टेलिव्हिजनचा सुपरस्टार असलेला राम कपूर सारखा दिग्गज नट सोबतीला तसेच अभिनेत्री मोना सिंग, शिखा या दोन्ही उत्तम अभिनेत्री सोबत स्क्रीन शेअर करणं हे खरंच उत्साही होत. मिस्त्री मधल्या भूमिकेचं सगळेच कौतुक करतात हे बघून आपलं काम सार्थकी झालं याचा आनंद होत आहे.”
धर्मवीर, मुळशी पॅटर्न, फुलवंती, असे लोकप्रिय चित्रपट असो किंवा नुकतंच आलेलं ‘मी vs मी’ नाटक असो क्षितीशची अभिनयशैली ही कायम चर्चेत राहणारी ठरली आहे आणि म्हणून ‘मिस्त्री’ मधला पोलीस बंटी देखील तेवढाच प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. ‘मिस्त्री’ ही वेब सिरीज जिओ हॉटस्टार वर रिलीज झाली आहे. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.