फोटो सौजन्य - Social Media
कसलेले कलाकार, उत्तम कथानक असलेला ‘स ला ते स ला ना ते’ या ‘नात्यांच्या व्याकरणाची गोष्ट’ अशी टॅगलाइन असलेला हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली येथे चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकरांच्या उपस्थितीत अनोख्या पद्धतीने लाँच करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात सायकल सफरीने झाली होती. या चित्रपटाचे सगळे कलाकार या सोहळ्यात सहभागी झाले होते.
ज्यामध्ये, अभिनेत्री छाया कदम अभिनेता साईंकित कामत, रिचा अग्निहोत्री, पद्मनाभ बिंड, रमेश चांदणे, निर्माता- दिग्दर्शक संतोष कोल्हे, पटकथा आणि संवाद लेखक श्रीकांत बोजेवर, प्लाटून वन डिस्ट्रिब्यूटरचे शिलादित्य बोरा आणि अन्य तंत्रज्ञ सायकल सफर करत टायगर सफारीपर्यंत पोहोचले. तिथे निसर्गाच्या सानिध्यात पोस्टर लॉंचचा सोहळा पार पडला. त्यानंतर सगळ्या कलाकारांनी टायगर सफारीचा आनंद घेतला. सोहळ्यासाठी, सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी प्रवासी भटक्याची वेशभूषा केली होती.
२०२४ मधील निर्माता आणि अभिनेता स्वप्नील जोशीचे हे दोन चित्रपट ठरले हाययेस्ट ग्रोसिग फिल्म!
चित्रपटाची कथा
न्यूज चॅनेलचा पत्रकार आणि पर्यावरणप्रेमी तरुणी यांच्या नात्याची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर हिरव्यागार वनराईतून जाणारा रस्ता दिसतो आहे. त्यामुळे प्रेमकथेसह पर्यावरणाशी संबंधित ही गोष्ट असल्याचा अंदाज बांधता येतो. पण ‘स ला ते स ला ना ते’ असं या चित्रपटाचं नाव का आहे, या प्रश्नाचं उत्तर ७ फेब्रुवारीला चित्रपटगृहातच मिळणार आहे. या चित्रपटाची ही अनोखी कथा आणि कलाकार पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट दमदार स्टारकास्टसह लवकरच सिनेमागृहात दाखल होणार आहे.
चित्रपटातील तगडे कलाकार
स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स प्रस्तुत ‘स ला ते स ला ना ते’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे. श्रीकांत बोजेवार, तेजेश घाडगे, संतोष कोल्हे यांनी पटकथा लेखन तर श्रीकांत बोजेवार यांनी संवाद लेखन केले आहे. विनायक जाधव यांनी छायांकन तर सचिन नाटेकर यांनी संकलन, आणि एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन केले आहे. रोहित नागभिडे यांनी चित्रपटाचे पार्श्वसंगीत पहिले आहे. रोहित प्रधान यांना चित्रपटाची ध्वनिआरेखन केलं आहे.
दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी नेहमीच वेगळ्या कलाकृती केल्या आहेत. त्यांच्या मराठी-हिंदी टीव्ही मालिका खूप प्रसिद्ध झाल्या आहेत. आणि प्रेक्षकांनी यांना भरभरून प्रतिसाद देखील दिला आहे. तसेच चित्रपटांतून मनोरंजक पद्धतीनं सामाजिक भाष्य करण्याची त्यांची शैली आहे. ‘स ला ते स ला ना ते’ हा चित्रपट विविध महोत्सवांमध्येही दाखवला गेला आहे. अभिनेता उपेंद्र लिमये, छाया कदम यांच्यासह रिचा अग्निहोत्री, साईंकित कामत, पद्मनाभ बिंड, मंगल केंकरे, वंदना वाकनीस, सुदेश म्हशीलकर, रमेश चांदणे, सिद्धीरूपा करमरकर यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येणाऱ्या नवीन वर्षात ७ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.