photo creadit - instagram
राज्यरक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने मालिकेमध्ये येसूबाईंची भूमिका साकारली होती. आता तिला खऱ्या आयुष्यात देखील तिचा शंभूराज मिळाला आहे. अभिनेत्रीने आता स्वतःच्या लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना खुश करून टाकले आहे, अभिनेत्रीने सोशल मीडियावर लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता चाहते तिच्या लग्नाचे फोटो पाहून तिचे अभिनंदन करत आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने आज २ डिसेंबर २०२५ रोजी लग्न करून तिच्या नवीन आयुष्याचा अध्याय सुरु केला आहे. लग्नाच्या फोटोमध्ये प्राजक्ता आणि शंभूराज खूप सुंदर दिसत आहेत. प्राजक्ताने लग्न समारंभात हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. सोबतच तिचा मेकअप देखील आकर्षित केला आहे. तसेच शंभूराज खुटवडने देखील तिला मॅचिंग कुर्ता पायजमा घातला आहे. तसेच त्याने हातात तलवार देखील घेतली आहे. दोघांनी लग्नाच्या मंडपात शाही अंदाजात एन्ट्री करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा होणार नवरा शंभूराज खुटवड हा एक उद्योगपती आहे. तसेच प्राजक्ता आणि शंभूराजची जोडी खूप सुंदर दिसत आहेत. चाहते त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून आता त्यांचे अभिनंदन करत आहेत. प्राजक्ता आणि शंभूराजचा शाही विवाहसोहळा पुण्यात थाटामाटात पार पडला आहे. ज्याच्या लग्नाला कुटुंबासह सेलिब्रेटींनी देखील हजेरी लावली आहे. प्राजक्ताच्या लग्नामधील मंगळसूत्राने देखील चाहत्याने लक्ष वेधले आहे. काही व्हायरल होणाऱ्या त्यांच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये तिचा लांबलचक मोठे मंगळसूत्र पाहून चाहते चकीत झाले आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता तिच्या लग्नासाठी खूप उत्साही आहे. तिने तिच्या लग्नसोहळ्या आधी होणाऱ्या सगळ्या कार्यक्रमाचे फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. सध्या तिच्या हळदी समारंभ, संगीत सोहळा आणि घाणाच्या कार्यक्रमाचे फोटो व्हायरल होत आहेत. आणि आता लग्नाचे फोटो देखील चर्चेत आहे. प्राजक्ताबद्दल बोलायचं झालं तर, तिने मनोरंजन विश्वात अनेक मालिकांमध्ये, सिनेमांमध्ये काम केलेलं. पण तिला खरी ओळख मिळाली ती, झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेमुळे. मालिकेतील महाराणी येसूबाईंच्या भूमिकेमुळे प्राजक्ता घराघरांत पोहोचली.






