(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय,” असं म्हणत रितेश देशमुख घेऊन येत आहे बिग बॉस मराठी चा नवा सिझन ६. ‘बिग बॉस’च्या नव्या प्रोमोमुळे महाराष्ट्रात एकच विषय, एकाच धमाकाच्या चर्चा होत आहे. ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ ची सगळीकडे उत्साहाची लाट उसळली आहे. रितेश भाऊंचा मस्त लूक, दमदार स्वॅग प्रेक्षकांची मने जिंकत आहे. “मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय…आहात ना तय्यार!” भाऊच्या या वाक्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. नव्या सिझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मागील सिझनने जबरदस्त धुमशान घातलं आणि यंदाच्या सिझनमध्ये Swag तोच असणार आहे, पण पॅटर्न रितेश भाऊंचा असणार आहे.
आता शोचा पॅटर्न काय असणार? कसा लूक असणार? सदस्य कोण येणार? हे सगळं अजून गुलदस्त्यात आहे. बिग बॉस मराठी सिझन ६ येत्या नवीन वर्षात ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वा. कलर्स मराठी आणि JioHotstar वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसेच रितेशचे होस्टिंग पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच या भागात कोण कोणते स्पर्शक सहभागी होणार हे देखील अद्यापही समजलेले नाही आहे. ‘बिग बॉस’चा हा नवा सिझन धमाका करेल हे नक्की आहे.
भाऊच्या एन्ट्रीसाठी उभारलेला आलिशान सेट, भव्य मिरवणुकीचे वातावरण, ढोल–ताशांचा गजर, रंगीबेरंगी रोषणाई आणि तब्बल २५० ते ३०० लोकांची दणदणीत उपस्थिती या सगळ्यांच्या साक्षीने पार पडला बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचा लार्जर-दॅन-लाईफ प्रोमो. रितेश भाऊने पहिल्यांदाच प्रोमोमध्ये पारंपरिक वेशभूषा केली आहे. प्रत्येक फ्रेममध्ये त्यांचा दिसणारा स्वॅग प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या नव्या प्रोमोने बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनची उत्सुकता वाढवली आहे. दरम्यान, सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे आणि चर्चेत आहेत प्रोमोमधले रितेश भाऊंचे कडक डायलॉग… घरात कुणाचा नवस पूरा होणार? तर कुणाच्या सलामीने वातावरण झिंगणार? “काही असे हि असणार… पण, मी गप्प नाही बसणार…! अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत लवकरच!’ असे या प्रोमोमध्ये बोलताना दिसला आहे.
या सिझनमुळे महाराष्ट्राला नक्की वेड लागणार आहे. बिग बॉस मराठी सिझन ६ प्रेक्षकांना ११ जानेवारीपासून पाहायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात अनेक कलाकार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सहभागी झाले होते. फिनालेपर्यंत सुप्रसिद्ध गायक अभिजीत सावंत आणि सुरज चव्हाण उभे राहिले होते. यात सुरज चव्हाण बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. आणि तो त्याच्या नावावर ही मोठी ट्रॉफी करून गेला.






