(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि अभिनेता राहुल देशपांडे नुकतेच त्यांच्या पत्नीपासून विभक्त झाले. १७ वर्षांच्या संसारानंतर राहुल आणि नेहा यांनी घटस्फोट घेतला आहे. राहुल देशपांडेच्या डिवोर्सच्या बातमीनंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. गायकाच्या डिवोर्सची बातमी चर्चेत असताना आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीच्या नवऱ्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. अभिनेत्रीच्या डिवोर्सची माहिती समोर येताच चाहत्यांना धक्का बसला आहे. आता ही अभिनेत्री नक्की कोण आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
टीव्ही अभिनेता आशिष कपूर कायद्याच्या कचाट्यात, ‘या’ गंभीर आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी केली अटक
‘संगीत देवबाभळी’ हे नाटक सध्या खूप चर्चेत आहे. नाटकाचे प्रयोग सगळे हाऊसफुल सुरू आहेत. याच नाटकामधील आवलीची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी सदावर्ते ही आता लग्नाच्या ५ वर्षानंतर पती पासून विभक्त होणार आहे. अभिनेत्रीच्या नवऱ्यानं स्वतः ही बातमी सोशल मीडियावर पोस्ट शेअर दिली आहे. दोघांनी सामंजस्यानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटले आहे.
आनंद ओक असे अभिनेत्रीच्या नवऱ्याचे नाव आहे. तो एक संगीतकार आहे. आनंद ओक यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिले की, “प्रिय मित्रांनो, मी आणि शुभांगीने काही वर्षांपूर्वीच परस्पर सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हे स्वीकारण्यास आम्हालाही थोडा वेळ लागला. पण आता हा निर्णय जाहीर करण्याची योग्य वेळ आली आहे. आम्ही एकत्र जे क्षण घालवले आहेत त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. शुभांगीला तिच्या भविष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. ती उत्तम अभिनेत्री आहे आणि खूप चांगली व्यक्ती आहे. भविष्यात आम्हाला जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही नक्कीच एकत्र काम करू जसं यापूर्वीही एकत्र काम केलं आहे.” असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
Bigg Boss 19: ‘बिग बॉस’ च्या घरात कॅप्टनसीसाठी सुरु झाले स्पर्धकांमध्ये युद्ध, कोण बनणार नवा कॅप्टन?
शुभांगी आणि तिचा नवरा आनंद सध्या संगीत देवबाभळी या नाटकात एकत्र काम करत आहे. आनंद ओक हा संगीत देवबाभळीचा संगीतकार आहे. २०२० मध्ये दोघांनी लग्न केले होते. अखेर लग्नाच्या ५ वर्षांनी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात त्यांनी या दोघांनी लग्न केले होते. लग्नानंतर कोरोना काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता. हातात काम नसल्याने दोघांनी नाशिकमध्ये फुड स्टॉल सुरू केला होता. दोघांनी एकमेकांना खंबीर साथ दिली होती. पण अखेर लग्नाच्या काही वर्षांनी दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ज्याने अभिनेत्रीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.