(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
जीवा नंदिनी, पार्थ काव्या यांची एकमेकांशी मनाविरूद्ध लग्न झालेली असताता. पण, हळूहळु आता या जोडप्यांमध्ये प्रेम बहरू लागलं आहे. जीवाला ऑफिसमध्ये यश मिळते तर, काव्या परिक्षेत उत्तीर्ण होते यानिमित्ताने देशमुखांनी पार्टीचे आयोजन केली होती. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला येत्या 16 डिसेंबरला 1 वर्ष पूर्ण झाले आणि वर्षपूर्तीच्या या एपिसोडमध्येच प्रेक्षकांसाठी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. पार्टीत सगळा परिवार एकत्र पाहायला मिळाले आणि सगळं खुश होते. या पार्टीत जीवा आणि काव्याचे रोमॅंटिक फोटो स्क्रिवर झळकले यामुळे पार्थ आणि नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. या घटनेमुळे संपूर्ण देशमुख कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आता पुढील भागात नेमके काय होईल याचा एक खास प्रोमो समोर आला आहे.
स्टार प्रवाहने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे.या नव्या प्रोमोमध्ये असे दाखवण्यात आले की, नंदिनी आणि पार्थ या दोघांचा प्रेमावरचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे. स्टार प्रवाहने हा प्रोमो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याच्या नात्याला मिळेल का दुसरी संधी?
प्रोमोत असं दाखवले आहे की, नंदिनी जीवाने दिलेली साडी जाळून म्हणते की, ‘आज फक्त माझ्या नात्याला नाही, माझ्या विश्वासाला आग लागली आहे.’ त्यावर जीवा म्हणतो, ‘मी त्याच राखेतून आपलं जग पुन्हा उभं करेन, चकाचक बाई.’ दुसरीकडे पार्थ डोक्यावर पाणी ओतून म्हणतो की, ‘लग्न, प्रेमावर विश्वास ठेवणारा पार्थ आजपासून मेला.’ त्यावर काव्या म्हणते, ‘प्रेम करणारा पार्थ मी पुन्हा मिळवेन देशमुख.’
लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक जणांनी या प्रोमोवर कमेंट्स केल्या आहेत. काहींनी लिहिले, ”सगळं सुरळीत सुरू असताना कथानकाची वाट का लावली”, एकाने लिहिले, ”हे चुकीचे दाखवताय तुम्ही, काव्या किंवा जीवाने यातलं काही मुद्दाम केलेलं नाही”, तर काहींनी संताप व्यक्त केला आहे. तर काहींना मालिकेतील ट्विस्ट आवडला आहे. काहींनी कमेंट्स मध्ये याचीही आठवण करुन दिली की, काव्याने अनेकदा तिच्या भूतकाळाविषयी सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यानेच काही ऐकले नाही.अशा अनेक कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत. आता मालिकेत कोणते वळण येते हे पाहुयालोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या मोठा ट्वि्स्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला असून मालिकेत कोणते नवीन वळण येणार हे पाहुया






