Metro In Dino Box Office Collection Day 8 Anupam Kher Sara Ali Khan Pankaj Tripathi film Friday Collection
अनुराग बासू दिग्दर्शित ‘मेट्रो इन दिनों’ हा चित्रपट ४ जुलैला प्रदर्शित झाला. चित्रपटातील लोकप्रिय कलाकारांच्या अभिनयावर प्रेक्षकांनीच नाही तर, समीक्षकांनीही संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. चित्रपटाला गेल्या आठवड्याभरापासून बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाने गेल्या आठवड्याभरात २६. ८५ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाच्या आठव्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. चित्रपटाने आठव्या दिवशी किती कोटींची कमाई केली आहे, जाणून घेऊया…
“अखेर आज आमची इच्छा पूर्ण….”, संकर्षणने शेअर केला ‘त्या’ आजींसोबतचा भावूक व्हिडिओ…
आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अली फजल, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, अनुपम खेर आणि नीना गुप्ता स्टारर ‘मेट्रो इन दिनों’ चित्रपटाची सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या सात दिवसांत चित्रपटाने २६.८५ कोटींची कमाई केली होती. आता आठव्या दिवशी या चित्रपटाने २.२५ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आठ दिवसांत या चित्रपटाने एकूण २९ कोटींची कमाई केली आहे. लवकरच, हा चित्रपट ३० कोटींचा टप्पा पार करणार आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने शेअर केलेला आहे.
२००७ साली रिलीज झालेल्या, ‘लाईफ इन अ मेट्रो’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. त्या चित्रपटाला देखील प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. त्याप्रमाणेच ‘मेट्रो इन दिनों’ चित्रपटालाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘मेट्रो इन दिनों’ चित्रपटाला दुसऱ्या विकेंडलाही कसा प्रतिसाद मिळतो ? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. पहिल्या विकेंडला चित्रपटाच्या कमाईचा आकडा वाढला होता. आता दुसऱ्या विकेंडलाही कमाईचा किती आकडा वाढणार ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.