महादेव बेटिंग ॲप प्रकरणी (Mahadev betting app case) अभिनेता साहिल खान (Sahil Khan ) शनिवारी मुंबई पोलिसांसमोर हजर होणार आहे. याप्रकरणी आज साहिलचा जबाब नोंदवला जाणार आहे. या प्रकरणात अनेक स्टार्ससोबतच अभिनेता साहिलचेही नाव पुढे आले होते. या प्रकरणी त्याचा जबाब महत्त्वाचा मानला जात आहे.
[read_also content=”अक्षय कुमार की अजय देवगण! जाणून घ्या कुणी गाजवलं बॅाक्स ऑफिसचं ‘मैदान’ https://www.navarashtra.com/movies/bade-miyan-chote-miyan-vs-maidaan-box-office-collection-nrps-523181.html”]
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मुंबई पोलिसांनी सांगितले की, ‘महादेव बेटिंग ॲप प्रकरणी आज पोलीस साहिल खानचा जबाब नोंदवणार आहेत. या प्रकरणी माटुंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आणि नंतर हे प्रकरण तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून तपास सुरू आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
डिसेंबर 2023 मध्ये, मुंबई सायबर सेलच्या विशेष तपास पथकाने (SIT) महादेव बेटिंग ॲप प्रकरणात साहिल आणि इतर तिघांना समन्स बजावले होते. त्यांना डिसेंबरमध्ये एसआयटीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, तो पोलिसांच्या चौकशीसाठी हजर झाला नाही.
एफआयआरनुसार, या प्रकरणात सुमारे 15,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. गेल्या वर्षी या प्रकरणातील मुख्य आरोपी रवी उप्पल याला दुबईतील स्थानिक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या आदेशानुसार इंटरपोलने जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे दुबई पोलिसांनी ही अटक केली आहे. साहिलच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर तो ‘स्टाइल’ आणि ‘एक्सक्यूज मी’ सारख्या सिनेमांमध्ये दिसला आहे. अभिनेता असण्यासोबतच तो फिटनेस एक्सपर्ट देखील आहे.