गेल्या काही दिवसापासून सगळीकडे एका चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा आहे. तो म्हणजे नवरा माझा नवासाचा 2. अभिनेता सचिन पिळगांवकर, अभिनेता अशोक सराफ, अभिनेत्री सुप्रिया पिळगावंकर यांच्या भन्नाट अभिनयानं रंगलेला धमाल कॅामेडी चित्रपट अजुनही प्रेक्षकांचा आवडता चित्रपट आहे. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता प्रेक्षकांनाही आतुरता लागलेली आहे. आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नवरा माझा नवसाचा चित्रपटाची शुटींग सुरू झाली असून नुकताच सचिन पिळगांवकर यांनी चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे.
[read_also content=”मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल, छातीत दुखणं आणि अस्वस्थतेची केली होती तक्रार! https://www.navarashtra.com/movies/mithun-chakraborty-admittedin-a-private-hospital-in-kolkata-nrps-505768.html”]
काही दिवसापुर्वी सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली. तब्बल 20 वर्षानंतर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं त्यांनी सांगितल. तेव्हापासून मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाविषयी प्रेक्षकामध्ये चित्रपटाविषयी फार क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांसह सेलेब्रिट्रीही त्यांना चित्रपटासाठी शुभेच्छा देताना दिसत आहे. सोशल मीडियावर तर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
आता चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. “शूटिंग सुरू, मज्जा सुरू, ‘नवरा माझा नवसाचा २’…गणपती बाप्पा मोरया”, असं कॅप्शन देत सचिन यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अली असगर पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओला चाहत्यांसह सेलेब्रिटींनीही प्रितिक्रिया दिली आहे.