(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
तेलुगू सिनेमाचा पॉवर स्टार पवन कल्याण याचा ‘OG’ चित्रपट २५ सप्टेंबर रोजी जगभरात भव्य स्वरूपात प्रदर्शित झाला. दिग्दर्शक सुजीत यांनी दिग्दर्शित केलेल्या या mass action चित्रपटाने ‘Firestorm of Mumbai’ या टॅगलाइनसह चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. पवन कल्याण यांची स्टाईल, भूमिका आणि चित्रपटातील तीव्र अॅक्शन सिनेमा ग्राफीने चाहत्यांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्यास भाग पाडले. या अॅक्शन एंटरटेनरने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत दमदार सुरुवात केली.
‘OG’ ची विक्रमी सुरुवात
Sacnilk च्या माहितीनुसार, पवन कल्याण यांच्या ‘OG’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात एकूण ६३.७५ कोटींची निव्वळ कमाई केली. यापैकी एकट्या तेलुगू राज्यांमधून ६३ कोटींची कमाई झाली. तामिळ, हिंदी आणि कन्नड भाषांमध्येही चित्रपटाने चांगली सुरुवात केली. पहिल्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाची एकूण कमाई १६९.३ कोटींवर पोहोचली. यामध्ये तेलुगू आवृत्तीने एकटीने १६४.७५ कोटींची कमाई केली.
Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी ३’ ने अर्शद वारसीचा बदलला रेकॉर्ड, जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई
‘OG’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, रिलीजनंतर पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने विक्रमी कमाई केली. अॅक्शनने भरलेला आणि मुंबईतील अनोख्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना खूप भावला आहे.
दुसऱ्या आठवड्यातही OG ने देशभरातील अनेक थिएटरमध्ये आपली स्क्रीन संख्या कायम ठेवली, मात्र कमाईत थोडीशी घट पाहायला मिळाली. ९व्या दिवशी, म्हणजे दुसऱ्या शनिवारी, चित्रपटाची कमाई ४.७५ कोटी इतकी झाली. त्यानंतर १०व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या रविवारी, थोडी सुधारणा झाली आणि कमाईने ५ कोटींचा टप्पा पार केला.
सनी देओलने बॉबी देओलचा जीव कसा वाचवला, ‘या’ चित्रपटाच्या सेटवर घडला होता जीवघेणा अपघात
अशा प्रकारे, चित्रपटाची एकूण भारतामधील १० दिवसांची कमाई १७९.०५कोटी इतकी झाली आहे.तर दुसरीकडे, जगभरातील एकूण कमाई १० दिवसांत २०० कोटींच्या पुढे गेली असून, हा पवन कल्याणच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. चित्रपटातील अभिनय, अॅक्शन सीन आणि थमन यांचं दमदार संगीत यामुळे OG प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे.