नवराष्ट्रच्या दणक्यामुळे पीएमपीला जाग (फोटो- चंद्रकांत कांबळे)
‘नवराष्ट्र’च्या दणक्यामुळे पीएमपी प्रशासनाला जाग
रूट बोर्ड लावण्याचे देण्यात आले आदेश
डिजिटल रूट बोर्ड नसल्याने प्रवाशांची गैरसोय
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) च्या बसवरील मार्ग दर्शविणारा डिजिटल रूट बोर्ड (मार्ग फलक) व मागील दरवाज्याजवळ लावला जाणारा साधा रूट बोर्डही बहुतेक वेळा लावलेला नसतो.परिणामी प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही बाब दै.’नवभारत/नवराष्ट्र’ वृत्तपत्राने पीएमपी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पीएमपीचे (Pune News) सहव्यवस्थापकीय संचालक ॲलिस पोरे यांनी परिपञक काढून सर्व बसेसवर डिजिटल आणि साधे रूट बोर्ड लवकरात लवकर लावण्याचे आदेश दिले आहेत.
या परिपञकाच्या माध्यामातून वाहतूक विभागातील सर्व चालक वाहक, गॅरेज सुपरवायझर, टाईमकिपर, तसेच आगार व्यवस्थापक यांना कळवण्यात आले की, सीएनजी, मिडी बसेस व ई बसेसमध्ये अद्यावत एलईडी (डिजीटल) बोर्ड सिस्टीम कार्यान्वित असून देखील बहुतांश चालक सेवक शक्यतो खाजगी बसठेकेदाराकडील चालक सदरचा रुट बोर्ड सुरू करित नसल्यामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. विशेष: रात्रीच्या वेळी काही बसेसना एलईडी (डिजीटल) बोर्ड सिस्टीम कार्यरत नसल्यामुळे सहव्यवस्थापकीय संचालक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप
तसेच यांनी पीएमपी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की, गॅरेज सुपरवायझर हे डेपोतुन बस देतेवेळी आय.टी.एम.एस चेकींग एलईडी (डिजीटल) बोर्ड सिस्टीम चेक करून बसमार्गावर मार्गस्थ करावे. तसेच आगारातून बस जाताना बसच्या पुढील व मागील मार्गदर्शक फलक लावण्यात यावेत. जर आगाराकडे मार्गदर्शक फलक शिल्लक नसतील तर नविन बोर्ड तयार करून घ्यावे.तसेच चेकर सेवकांनी तिकीट तपासणी करताना एलईडी(डिजीटल) बोर्ड चालू आहे की नाही यांची शहानिशा करावी. आगार निहाय, आय.टी.एम.एस. यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी नेमलेल्या सेवकाने पहाटे ४ वाजता डेपोतून मार्गावर सर्व शेड्यूल जाण्यापर्यंत आगारामध्ये थांबून बसेस चेर्कीग करावे या सूचना देण्यात आले आहेत.
file:///C:/Users/Admin/Downloads/Document%203.pdf
Pune PMP News: पीएमपी प्रवाशांचा ऑनलाईन तिकीटाकडे कल; दररोज १ लाख…
काय आहे प्रकरण?
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) च्या बसवरील मार्ग दर्शविणारा डिजिटल रूट बोर्ड (मार्ग फलक) अनेक बसमध्ये बंद अवस्थेत आहे. तसेच मागील दरवाज्याजवळ लावला जाणारा साधा रूट बोर्डही बहुतेक वेळा लावलेला नसतो.त्यामुळे बस नेमकी कुठे जाणार आहे हे प्रवाशांना समजत नाही.परिणामी प्रवाशांचा (Pune News) वेळ वाया जात असून काही प्रवासी कंटाळून खाजगी वाहनांचा पर्याय निवडत आहेत. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जाण्याबरोबरच ५०० रुपयांचा बोर्ड न लावल्यामुळे पीएमपीचेही लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.






