Ranbir kapoor ramayan first glimpse to launch in waves summit in mumbai
नितेश तिवारी (Niteish Tiwari) दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून (Ramayana Movie)चित्रपटासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत तर अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी गेल्या अनेक महिन्यांपासून ‘रामायण’ चित्रपटावर काम करत आहेत. दोन भागात बनणाऱ्या या चित्रपटात बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटासंबंधित एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
चित्रपटासंबंधित दररोज वेगवेगळ्या बातम्या आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काही महिन्यांपूर्वीच दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. जर तुम्हीही या चित्रपटाची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. निर्माते लवकरच या चित्रपटाचा पहिला लूक करण्याच्या तयारीत आहेत. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिटचे आयोजन येत्या १ ते ४ मे दरम्यान जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.
बॉलीवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, आयोजकांनी या कार्यक्रमासाठी विविध इंडस्ट्रीतील अनेक चर्चेत असलेल्या चित्रपटांना आमंत्रित केले आहे. कार्यक्रमातील उत्साह वाढवण्यासाठी, ‘रामायण’ची टीम एक मोठी अपडेट देण्याची योजना आखत आहे. या वृत्तात सूत्रांनी दिलेल्या हवाल्याने असेही म्हटले की, निर्माते ‘रामायण’ चित्रपटाचे पोस्टर किंवा व्हिडिओ रिलीज करण्याची तयारी करत आहेत. दरम्यान, अद्याप अधिकृत ठरलेले नाही. अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत घेतला जाईल. जर सर्व काही अंतिम झाले तर वेव्हज ‘रामायण’ चित्रपटासाठी एक मोठे व्यासपीठ ठरू शकते.
विखुरलेले केस अन् विचित्र हास्य… ‘जारण’मधील अनिता दातेच्या लूकने सर्वांचेच वेधले लक्ष
निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी रामायण चित्रपटाचे एक नाही तर दोन भाग येणार आहे अस जाहीर केलं आहे. हे प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राईज असल्याचं मानलं जात आहे. या रामायण चित्रपटाचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, आणि यश यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार असून ‘केजीएफ’ फेम यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, अरूण गोविल राजा दशरथाची भूमिका साकारणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता कैकयीची भूमिका साकारताना दिसणार आहे.