अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिचा पती निक जोनास (Nick Jonas ) आणि मुलगी मालती मेरीसोबत भारतात आहे. अयोध्येला जाण्यापासून ते होळी साजरी करण्यापर्यंत प्रियांका संपूर्ण वेळ कुटुंबासोबत घालवत आहे. नुकतचं तिला तिच्या चुलत बहिण मन्नाराच्या बर्थडे पार्टीत स्पॅाट करण्यात आलं. यावेळी ती आई मधु चोप्रा आणि पती निक जोनाससोबत दिसली. यावेळी बर्थडे गर्लपेक्षा तिची बहिण प्रियंकाचा जास्त लाईमलाईटमध्ये होती.यावेळी तिनं मजेशीर स्टाइलमध्ये पति निकसाठी डान्स केला तो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनाही प्रियंका आणि निकमधील ही केमेस्ट्री चांगलीच आवडली आहे.
[read_also content=”‘टायटॅनिक’मधील नायिकेचा जीव वाचवणाऱ्या लाकडाचा लिलाव, ‘इतक्या’ कोटी रुपयांना विकला गेला https://www.navarashtra.com/movies/titanic-iconic-wooden-door-prop-that-saved-kate-winslet-life-from-drowning-sells-for-over-5-crore-at-auction-519168.html”]
अभिनेत्री आणि बिग बॉस 17 ची फायनलिस्ट मन्नारा चोप्राने शुक्रवारी रात्री तिचा 33 वा वाढदिवस उत्साहात साजरा केला. शुक्रवारी मुंबईत तिच्या वाढदिवसाची पार्टी होती. वाढदिवस मन्नाराचा होता मात्र सगळीकडे चर्चा होती ती तिची प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांची. प्रियांका आणि निकने या पार्टीची शोभा वाढवली. यावेळी प्रियांका आणि निक यांनी मनाराला केवळ शुभेच्छाच दिल्या नाहीत तर तिच्यासोबत पॅप्ससमोर अनेक फोटो क्लिक केले.
फोटोसेशन दरम्यान असे काही घडले की सर्वांच्या नजरा प्रियांका आणि निकवर खिळल्या. प्रियंका मन्नारा आणि मिताली हांडासोबत पोज देत होती, जेव्हा पापाराझींनी निक जोनासलाही फोटोसाठी विनंती केली. त्यानंतर काही अंतरावर उभा असलेला निक पुढे सरकताच प्रियांका चोप्रा मजेशीर स्टाईलमध्ये डान्स करत तिच्या दिशेने कंबर हलवू लागली. हा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. निकसाठी प्रियंकाचा मजेशीर आणि रोमॅन्टिक अंदाज नेटकऱ्यांना खुप आवडला आहे.
यावेळी मनारा चोप्राने लाल रंगाचा रफल ड्रेस घातला होता. त्यावर तिने तिचा लूक सिल्व्हर डँगलर्स आणि हील्सने पूर्ण केला. तर प्रियंका चोप्राने पार्टीसाठी पांढऱ्या रंगाचा निवडला. पांढऱ्या रंगाच्या ब्रालेट आणि लॅान्ग स्कर्टमध्ये प्रियंत खूपच ग्लॅमरस दिसत होती. तर निकने पाढंरा हिरव्या कॅाम्बिनेशनचा फ्लोरल प्रिंटचा शर्ट आणि पिवळ्या रंगाची पॅन्ट घातली होती.
प्रियांका चोप्रा अनेक वर्षांनी भारतात इतका वेळ घालवत आहे. मुंबईत ईशा अंबानीच्या रोमन होली पार्टीला हजेरी लावल्यानंतर प्रियांका तिच्या कुटुंबासह अयोध्या राम मंदिरात गेली होती. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आले व्हायरल झाले होते. त्यानंतर प्रियांकाने निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसोबत होळीही साजरी केली. प्रियांका चोप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, अभिनेत्री शेवटची वेब सीरीज ‘सिटाडेल’ आणि ‘लव्ह अगेन’ चित्रपटात पडद्यावर दिसली होती.