संपूर्ण देशातून कॅामेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त होत असताना त्यांच्याबद्दल एक पॅझिटिव्ह माहिती समोर येत आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर असून फेक न्यूजकडे दुर्लक्ष करा अशी विनंती त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे.
हृदयविकाराच्या झटक्यानंतर बुधवारी कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना दिल्लीतील एम्स (Delhi AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली. राजू यांच्या प्रकृतीविषयी सोशल मीडियावर चिंता व्यक्त होत असतानाच त्यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी त्याबद्दल माहिती दिली. राजू यांची प्रकृती स्थिर असून फेक न्यूजकडे दुर्लक्ष करा अशी विनंती त्यांनी केली आहे. राजू यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर याविषयी पोस्ट लिहिण्यात आली. “राजू यांची प्रकृती स्थिर आहे. ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. सोशल मीडियावर पसरणाऱ्या फेक न्यूजकडे (Fake News) कृपया दुर्लक्ष करा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा”, अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर करण्यात आली. या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.
[read_also content=”राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा, बोटांनंतर खांद्याचीही हालचाल पण मेंदूकडून प्रतिसाद नाही https://www.navarashtra.com/movies/rapid-improvement-in-raju-srivastavas-health-after-fingers-shoulder-is-moving-but-brain-is-still-not-responding-nrps-315458.html”]
राजू श्रीवास्तव यांनी बुधवारी सकाळी व्यायाम केला होता. त्याच दिवशी ते पुन्हा एकदा वर्कआऊट करायला गेले तेव्हा त्यांना बरं वाटत नव्हतं. त्यानंतर त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यांच्या ट्रेनरने त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं, जिथे डॉक्टरांनी विलंब न करता त्यांना CPR दिला.
[read_also content=”संजय शिरसाटांचं ‘ट्विट पे ट्विस्ट’ आता म्हणाताय….मी एकनाथ शिंदेसोबत होतो https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-shirsath-delet-the-tweet-about-udhhav-thackeray-nrps-315477.html”]