बॅालिवूडमध्ये वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट देणारे दिग्दर्शक रामगोपाल (Ram Gopal Varma ) वर्मा काही ना काही कारणाने चर्चेत असतात. सध्या ते सिनेसृष्टीत फार अॅक्टिव्ह नसले तरी सामाजिक जिवनात फार अॅक्टीव्ह असतात. आता त्यांच्या नावाची खुप चर्चा होऊ लागली आहे. त्यांच्या कोणत्या नव्या चित्रपटाबद्दल नव्हे तर त्यांच्या राजकीय प्रवेशाबददल आहे. दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी आता राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. ते आंध्र प्रदेशमधील पिठापुरम (Pithapuram ) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. महत्त्वाचं म्हणजे याच मतदारसंघातून दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण निवडणूकीच्या रिंगणात आहेत. दोघही एकच मतदार संघात असल्याने आता ही निवडणूक रंगतदार होईल, यात शंका नाही.
[read_also content=”कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल https://www.navarashtra.com/india/case-has-been-registered-against-former-chief-minister-of-karnataka-b-s-a-yeddyurappa-under-the-pocso-act-nrps-515481.html”]
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी X वर एक पोस्ट शेअर करून त्यांच्या राजकीय प्रवेशाबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी X वर लिहिले की, ‘अचानक घेतलेला निर्णय, मला कळवताना आनंद होत आहे की मी पिथापुरममधून निवडणूक लढवत आहे.’ मात्र, ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
SUDDEN DECISION..Am HAPPY to inform that I am CONTESTING from PITHAPURAM ??
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 14, 2024
रिपोर्टनुसार, ज्या मतदार संघातून दिग्दर्शनक राम गोपाल वर्मा निवडणूक लढवणार आहे. त्याच मतदारसंघातून अभिनेता पवन कल्याणही निवडणूक लढवत आहे. पवन कल्याण यांचा जनसेना नावाचा पक्ष आहे. तेलुगू देसम पक्ष (टीडीपी), भाजपा आणि जनसेना पक्ष (जेएसपी) यांच्या युतीने तेलुगू चित्रपट स्टार पवन कल्याण यांना उमेदवारी दिली आहे. तर, रामगोपाल वर्मा हे वायएसआर काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.