मुंबई : काही दिवसापुर्वी न्यूड फोटोशूट करत खळबळ उडवून देणार अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) नावाची पुन्हा चर्चा होतेय. न्यूड फोटोशूट प्रकरणी वादळ उठल्यानंतर आता रणवीरनं चेंबुर पोलिसांत (Chembur) जाऊन जबाब नोंदवला आहे. दोन तासाहून अधिक वेळ रणवीरचा जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती आहे.
[read_also content=”धक्कादायक! सनकी माणसाने रागाच्या भरात संपवलं अख्ख कुंटुब https://www.navarashtra.com/india/a-man-killed-his-whole-family-in-deharadun-nrps-320403.html”]
अभिनेता रणवीर सिंगने काही दिवसांपूर्वी न्यूड फोटो टाकल्याने खळबळ उडाली होती. यावरून सिनेक्षेत्रासह देशभरात एकच खळबळ उडाली होती. त्याच्या या कृतीवरून सोशल मिडियावर त्याला ट्रोल व्हाव लागलं होतं तर अनेकांनी त्याच्या कृतीचं समर्थनही केलं होतं. या प्रकरणी त्याच्याविरोधात तक्रारही दाखल झाली होती. या पार्श्वभुमीवर त्याने आता चेंबुर पोलिसांत जाऊन जबाब नोंदवल्याची माहिती आहे.
[read_also content=”अनुपम खेर आणि दीप्ती नवल यांच्या हस्ते झालं परिक्षित साहनींच्या ‘स्ट्रेंज एन्काउंटर्स’ पुस्तकाचं प्रकाशन https://www.navarashtra.com/movies/parikshit-sahnis-strange-encounters-book-launch-by-anupam-kher-and-deepti-naval-nrsr-320404.html”]