हानिया आमिर-बादशाह : भारतामधील प्रसिद्ध रॅपर बादशाह (Badshah) काही दिवसांपूर्वीच त्याचे फोटो पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबतचे (Pakistani actress Hania Aamir) फोटो व्हायरल झाले होते. हानिया आमिर आणि बादशाह पुन्हा एकदा दुबईममध्ये भेटले आहेत. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाकिस्तानी ड्रामा मेरे हमसफर यामधील अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीने हिंदी आणि पंजाबी गाण्यांवर स्वत:चे जॅमिंग आणि नृत्य करतानाचे व्हिडिओ पोस्ट करून तिच्या चाहत्यांना नेहमीच भुरळ घातली आहे. आता, अभिनेत्याने बादशाह सोबतचा स्वतःचा फोटो पोस्ट करून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
हानिया आमिरची पोस्ट
हानिया आमिरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये पहिला फोटो हा बादशहा आणि हानिया आमिरचा आहे. त्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये हॉटेलमध्ये जेवणाचा फोटो आहे. तर दुसऱ्या हानियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
हानिया आमिरने शेअर केलेला व्हिडीओ
हानिया आमिरने बादशाह सोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते मस्ती करताना दिसत आहेत. हे दोघे या व्हिडिओमध्ये गाताना आणि हसताना दिसत आहेत.
हानियाने बादशाहसोबतचे फोटो शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही. डिसेंबर २०२३ मध्ये, हानियाने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली होती ज्यात बादशाहसोबत हँग आउट करतानाचे स्पष्ट फोटो, त्यांच्या आणि करण औजला यांच्यासोबतच एक ग्रुप फोटो होता.