कपूर घराण्यातील मुलगी करतेय बॉलीवूडमध्ये पदार्पण (फोटो सौजन्य - Instagram)
कपूर कुटुंबातील मुलींची नावे जेव्हा जेव्हा येतात तेव्हा करीना आणि करिश्माची नावे नेहमीच मनात येतात. कारण त्यांनी वर्षानुवर्षे चित्रपट उद्योगावर राज्य केले. पण आता या कुटुंबातील आणखी एक मुलगी बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे या सुंदरीचे आई-वडील, भाऊ आणि वहिनी हे चौघेही सुपरस्टार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता नक्की कोण करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण? तेदेखील वयाच्या 44 व्या वर्षी, नक्की कोण आहे ही? याबाबत आपण अधिक जाणून घेऊया
ही ४४ वर्षांची सुंदरी दुसरी तिसरी कोणी नसून रिद्धिमा कपूर आहे. रिद्धिमा ही ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी आहे, तर ती रणबीर कपूरची सख्खी बहीण आणि आलियाची वहिनी आहे. २०२४ मध्ये, तिने ‘बॉलिवूड लाईव्हज विरुद्ध बॉलीवूड वाइव्हज’ या मनोरंजन कार्यक्रमातून रियालिटी शोमध्ये पदार्पण केले. पण आता ती आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे आणि लवकरच चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
रिद्धिमा करणार अभिनय
रिद्धीमा करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण
हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना रिद्धिमाने सांगितले की, आता ती चित्रपटांमध्ये काम करेल. जेव्हा याबद्दल रिद्धिमाला विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, ‘हो, मी सध्या एका चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.’ रिद्धिमाने चित्रपटाबद्दल अधिक माहिती दिली नाही, परंतु ती जूनपर्यंत येथे शूटिंग करणार असल्याचे निश्चितपणे सांगितले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी थोडे थांबवे लागणार आहे. रिद्धीमाने याबाबत अधिक उत्सुकता ताणून धरली आहे.
“मराठी शाळा जगल्या तर मराठी भाषा जगेल”, महाराष्ट्रदिनी हेमंत ढोमे यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा
कपिल शर्माही असू शकतो
जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, रिद्धिमा व्यतिरिक्त, कॉमेडी स्टार कपिल शर्मा आणि नीतू कपूरदेखील या चित्रपटात दिसू शकतात. तथापि, अभिनेत्रीने चित्रपटाचे शीर्षक सांगितले नाही किंवा इतर कोणतीही माहिती दिली नाही. तिने फक्त एवढेच सांगितले की ती सध्या अत्यंत आनंदी असून तिला हे काम करण्यात खूपच मजा येत आहे.
कोणतीही योजना नव्हती
पदार्पणाबद्दल आनंद व्यक्त करताना रिद्धिमा म्हणाली की ती तिची आई नीतू कपूरसोबत तिच्या चित्रपटातील लाईन्सचा सराव करते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येही तिची मुलगी समायरादेखील सेटवर येत राहते. तिने सांगितले की याबद्दल कोणतीही योजना आखली नव्हती. पण जेव्हा मला संपर्क साधण्यात आला तेव्हा मी लगेच हो म्हटले.
मी पटकथा ऐकली आणि मला ती आवडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिद्धिमाची एकूण संपत्ती ४३ कोटी रुपये आहे तर तिच्या पतीची एकूण संपत्ती २५२ कोटी रुपये आहे. रिद्धीमा दिल्लीत राहत असून ‘bollywood wives vs fabulous lives’ मधून तिने OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले होते आणि अनेकांना तिचे काम आवडले होते.