फोटो सौजन्य - Social Media
कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गेल्या आठवड्यात चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. शाब्दिक चकमक, आरोप-प्रत्यारोप, नियमभंग, तणावग्रस्त नाती आणि बदलती समीकरणं यामुळे घरातील वातावरण तापलेलं होतं. काही सदस्यांमध्ये घट्ट होत चाललेली मैत्री दिसली, तर काही नात्यांमध्ये दुरावा स्पष्टपणे जाणवला. या सगळ्या गदारोळात अभिनेता राकेश बापट याने साकारलेली बाप्पाची मूर्ती आणि प्राजक्ताने सादर केलेले भजन संपूर्ण महाराष्ट्राने उचलून धरले.
घरात नकारात्मकतेसोबतच सकारात्मक क्षणही अनुभवायला मिळाले. मात्र, अनुश्री आणि प्राजक्त यांच्यातील वादाने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. प्राजक्ताशी संवाद साधताना अनुश्रीचा आक्रमक सूर आणि दादागिरीची भाषा अनेकांना खटकली. या वादामुळे घरातील तणाव आणखी वाढलेला दिसून आला. नातेसंबंधांमध्ये वाढलेला हा तणाव थेट ‘भाऊचा धक्का’पर्यंत पोहोचला आहे.
या आठवड्याच्या ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेश देशमुख नेहमीप्रमाणे थेट, ठाम आणि स्पष्ट भूमिकेत दिसणार आहेत. प्रोमोमध्येच रितेश भाऊ अनुश्रीच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करताना दिसत असून, त्यांनी विचारलेला एक प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे. “अनुश्री, तुम्ही काय म्हणालात प्राजक्ताला? आईला घेऊन आलीस, आता बाबांना घेऊन ये. भावाला आणलाय, सांगा आता काय सांगणार? हे बिग बॉसचं घर आहे, इथे मस्तीत नाही तर शिस्तीत राहायचं.”
रितेश भाऊंच्या या ठाम शब्दांनंतर घरातील सर्व सदस्यांची बोलती बंद झालेली दिसते. जे सदस्य चुकीच्या वागणुकीमुळे चर्चेत होते, त्यांना जाब द्यावा लागणार आहे, तर काही सदस्यांचे रितेश भाऊ मनापासून कौतुक करताना दिसणार आहेत. या ‘भाऊचा धक्का’मध्ये नेमकं कोणाची शाळा होणार? कोणाला मिळणार दाद? आणि या शब्दिक धक्क्यानंतर घरातील समीकरणं कशी बदलणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. एकंदरीतच, हा वीकेंड ‘बिग बॉस मराठी: भाऊचा धक्का’ पुन्हा एकदा जबरदस्त ठरणार असून, अनुश्रीला नेमकं काय ऐकायला मिळणार आणि त्याचा घरावर काय परिणाम होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पहा ‘बिग बॉस मराठी: भाऊचा धक्का’, शनि–रवि, रात्री ८ वाजता, फक्त कलर्स मराठी आणि कधीही JioHotstar वर.






