‘मैत्री’ या शब्दात आनंद, दिलासा आणि आधार अशा तिन्ही गोष्टी आहेत. आनंद, राग, मनातील गुपितं व्यक्त करण्यासाठी हक्काची मैत्री असली की आयुष्य रंगतदार होतं हाच आशय अधोरेखित करणाऱ्या ‘रूप नगर के चीते’ (Roop Nagar Ke Cheetey Trailer Launch) या आगामी मराठी चित्रपटाचा (Marathi Movie) धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच दिमाखात संपन्न झाला. या चित्रपटाची निर्मिती एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी केली आहे. दिग्दर्शन विहान सूर्यवंशी (Vihan Suryavanshi) यांचे आहे. येत्या १६ सप्टेंबरला ‘रूप नगर के चीते’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हा चित्रपट प्रत्येकाला महाविद्यालयीन दिवसांची नक्कीच आठवण करून देईल, असा विश्वास चित्रपटाच्या कलाकारांनी व्यक्त केला. मैत्रीच्या नात्यातली आपली भावनिक गुंतवणूक सच्ची असते ती जपणे महत्त्वाचे असल्याचे सांगत हा चित्रपट प्रत्येकाला निखळ आनंद देईल असं दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनी याप्रसंगी सांगितलं. या चित्रपटातून प्रेक्षकांना बॉलिवूडसारखी भव्यता अनुभवायला मिळेल, असं निर्माते मनन शाह यांनी सांगितलं.
[read_also content=”घागरा आणि स्नीकर्स घालून तरुणाने ‘ढोली तारो ढोल बाजे’ गाण्यावर धरला ठेका, व्हिडिओ बघितला का ? https://www.navarashtra.com/viral/gujrati-choreaographer-janil-mehtas-garba-dance-with-wearing-ghagra-and-sneakers-nrsr-321818/”]
करण परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांसोबत हेमल इंगळे, आयुषी भावे, सना प्रभु, मुग्धा चाफेकर, तन्विका परळीकर, ओंकार भोजने, सौरभ चौघुले, रजत कपूर हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत.
‘रूप नगर के चीते’ या चित्रपटाचे लेखन विहान सूर्यवंशी, कार्तिक कृष्णन यांनी केले असून छायांकन संतोष रेड्डी तर संकलन गोरक्षनाथ खांडे यांचे आहे.