इडली डोसाची चव लागेल आणखीनच भारी! झटपट बनवा पचनास हलकी असलेली नीर चटणी
दक्षिण भारतीय पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणात सुद्धा अनेक दक्षिण भारतीय पदार्थ बनवले जातात. इडली, डोसा बनवल्यानंतर त्यासोबत खाण्यासाठी ओल्या खोबऱ्याची किंवा टोमॅटोची चटणी बनवली जाते. पण काहींना टोमॅटोची चटणी खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही इडलीसोबत खाण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये नीर चटणी बनवू शकता. साऊथमध्ये बनवला जाणारा अतिशय फेमस पदार्थ नीर चटणी. ही चटणी आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. नीर चटणी तुम्ही कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता. ही चटणी पातळ असल्यामुळे संपूर्ण पदार्थामध्ये व्यवस्थित मिक्स करून खाल्ली जाते. त्यामुळे अतितिखट आणि मसालेदार पदार्थ खाण्यास नको असतील तर नीर चटणी अतिशय उत्तम आहे. जाणून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Recipe : सकाळच्या नाश्त्याला काही टेस्टी आणि झटपट बनवायचं? मग घरी बनवा ‘ब्रेड ऑम्लेट टोस्ट’






