अभिनेता साहिल खानच्या (Actor Sahil Khan)अडचणी काही कमी होताना दिसत नाही आहे. महादेव बेटींग अॅप प्रकरणी (Mahadev Betting App case) त्याला रविवारी सकाळी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. छत्तीसगडमधून त्याला मुंबईत आणल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने साहिलचा जामीन अर्ज फेटाळला असून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. मात्र एफआयआरमध्ये त्याच्यावर कोणतेही आरोप करण्यात आलेले नाहीत.
[read_also content=”‘फिटनेस ट्रेनरला द्यायला पैसै नव्हते तर लोकं म्हणाले बॉलिवूड सोड’, परिणीती चोप्राला मिळाला होता सल्ला! https://www.navarashtra.com/movies/parineeti-chopra-was-told-to-leave-bollywood-if-she-cant-afford-fitness-trainer-nrps-528032.html”]
साहिल खानला ताब्यात घेतल्यानंतर, मुंबई पोलिसांनी त्याला शिंदेवाडी न्यायालयात हजर केले. पोलिसांनी एफआयआरमध्ये साहिलवर कोणतेही आरोप केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. महादेव बेटिंग ॲप आणि द लायन बेटिंग ॲप यांच्यातील कराराची प्रत न्यायालयात सादर करण्यात आली. या करारानुसार, सेलिब्रिटी असल्याने साहिलची भूमिका खूपच मर्यादित होती. त्याच्या नावावर एकही सिमकार्ड नोंदणीकृत नाही. अभिनेत्याचे बँक स्टेटमेंटही गोळा करण्यात आले आहे.
गेल्या वर्षभरापासून महादेव बेटिंग ॲप प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. आता या यादीत साहिल खानच्या नावाचाही समावेश झाला आहे. तो Lotus Book 24/7 नावाच्या बेटिंग ॲप वेबसाइटचा भागीदार आहे, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा भाग आहे.अशी माहिती पोलिसांनी दिली.
साहिलने लायन बुक ॲपचा प्रचार आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा आरोप आहे. लायन बुकची जाहिरात केल्यानंतर त्यांनी भागीदार म्हणून Lotus Book 24/7 ॲप लाँच केले. ॲपच्या प्रचारासाठी साहिलने आपला प्रभाव वापरला. तो सेलिब्रिटींना आमंत्रित करायचा आणि भव्य पार्ट्यांचे आयोजन करायचा. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच पोलीस प्रकरणातून आणखी अनेक मोठे पैलू समोर येऊ शकतात.
अभिनेता साहिल खान आता बॅालिवूडमध्ये अॅक्टिव्ह नाही. त्याने एक्सक्यूज मी आणि स्टाईल सारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. मात्र, तो मनोरंजन क्षेत्रात हवा तसा प्रभाव पाडू शकला नाही. यानंतर त्यांने इंडस्ट्री सोडली. यानंतर त्याचा फिटनेस एक्सपर्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. साहिल डिव्हाईन न्यूट्रिशन नावाची कंपनी चालवतो, जी फिटनेस सप्लिमेंट्स विकते. साहिल म्हणाला की तो टॅलेंटेड आहे, पण त्याच्या टॅलेंटचा चित्रपटांमध्ये योग्य वापर झाला नाही. त्यामुळेच त्यांनी ते क्षेत्र सोडलं.