बिग बॉस ओटीटी : टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टेलिव्हिजन वरचा बिग बॉस ओटीटीवर सुद्धा प्रदर्शित होतो. बिग बॉस ओटीटी सिझन 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी 3’मधून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘बिग बॉस 17’ संपल्यानंतर निर्माते ओटीटीच्या तिसऱ्या आवृत्तीची तयारी करत आहेत. या शोसाठी आतापर्यंत अनेक स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.
याचदरम्यान बिग बॉस ओटीटी सिझन 3 साठी आणखी एका स्पर्धकाचे नाव समोर आले आहे, जे वेब सीरिजच्या जगात प्रसिद्ध नाव आहे. सलमान खानने होस्ट केलेल्या या शोसाठी टेलिव्हिजन जगतातील अनेक लोकप्रिय नावे पुढे आली आहेत. दिलबर आर्या, शीझान शान, शहजादा धामी , प्रतिक्षा होनमुखे , दलजीत कौर, धनश्री वर्मा यांच्यासह अनेकांची नावे पुढे आली आहेत. या यादीत वेब सीरिजचा लोकप्रिय चेहरा असलेल्या अभिनेत्रीचे नावही चर्चेत आहे. ‘ॲडल्टिंग’ स्टार आयशा अहमद ‘ बिग बॉस OTT 3 ‘ चा भाग असू शकते , असे वृत्त टेलीचक्करने दिले आहे. आयशा ही लोकप्रिय अभिनेत्री रुखसार रहमानची मुलगी आहे. रुखसार ‘और प्यार हो गया’, ‘ची एंड मी’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘बाल वीर’, ‘द नाईट मॅनेजर’ यांसारख्या शो आणि वेब सीरिजचा भाग आहे.
‘बिग बॉस ओटीटी 3’ साठी जाहीर केलेल्या नावाला निर्मात्यांनी अद्याप मान्यता दिलेली नाही. हा शो सुरू होण्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु जूनच्या मध्य आठवड्यात हा शो सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.