Battle of Galwan Movie Salman Khan First Look Out
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याला विशेष ओळखीची गरज नाही. कायमच बॉक्स ऑफिसवर अफलातून कमाई करणाऱ्या भाईजानच्या चित्रपटांना सध्या अच्छे दिन पाहायला मिळत नाहीये. ‘किसी का भाई और किसी की जान’ आणि ‘सिकंदर’ हे दोन्हीही चित्रपट सलमान खानचे बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले. गेल्या काही वर्षांपासून भाईजान आपली जादू दाखवण्यासाठी काही अंशी अपयशी होताना दिसत आहे. सध्या सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. कायमच रोमँटिक हिरो आणि दमदार ॲक्शन करणारा भाईजान आता एका अनोख्या भूमिकेत दिसणार आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार आता लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच सलमान खानच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. सलमान आता लवकरच गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित असलेल्या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्याच्या ह्या आगामी चित्रपटाबद्दल प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. अखेर, सलमान खानच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ‘बॅटल ऑफ गलवान’ (Battle of Galwan)चा मोशन पोस्टर आज प्रदर्शित झाला आहे.
“उपाध्येंचा ‘राशीयोग’ बरा नव्हता…”; मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, निलेश साबळेबद्दल म्हणाले…
सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही तासांपूर्वीच ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर केलेला आहे. या शेअर केलेल्या मोशन पोस्टरमध्ये सलमान खानचा रक्ताने माखलेला चेहरा, रुबाबदार मिशी आणि डोळ्यात देशभक्तीच्या ज्वाला बघायला मिळत आहे. चित्रपटाच्या मूळ संकल्पनेवर प्रकाश टाकत, हे पोस्टर भारताच्या इतिहासातील सर्वात क्रूर पण गोळ्या न झाडता लढल्या गेलेल्या युद्धाची कहाणी सांगते. १५,००० फूट उंचीवर लडाखच्या गलवान खोऱ्यात घडलेला हा संघर्ष भारताच्या अदम्य साहसाचे प्रतीक ठरला आहे.
‘बॅटल ऑफ गलवान’ ही कहाणी आहे १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात भारतीय व चीनी सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाची. हे युद्ध पारंपरिक शस्त्रांऐवजी दगड, लाकडी काठ्या आणि हातांनी लढले गेले होते. कारण त्या भागात बंदुका वापरण्यावर बंदी होती. या संघर्षात दोन्ही देशांच्या अनेक जवानांनी आपले प्राण गमवावे लागले. या संघर्षात सीमेवर मृत्यूची नोंद झाली.
मुलाच्या मृत्यूची खोटी बातमी कोणी पसरवली? पोस्ट शेअर करत रेशम टिपणीस संतापली
सलमान खान याच्या नव्या रूपात पाहणे हा अनुभव निश्चितच आगळा-वेगळा ठरणार आहे. भारताच्या वीर जवानांच्या बलिदानाची ही गाथा प्रत्येक भारतीयाने पाहिलीच पाहिजे, अशी भावना या मोशन पोस्टरमधून उमटते. ‘बॅटल ऑफ गलवान’ – एक असा चित्रपट, जो केवळ मनोरंजन नव्हे, तर प्रेरणा देणारी वास्तव कहाणीही ठरणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट अद्याप गुलदस्त्यातच आहे.