प्रविण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपट (Sarsenapati Hambirrao) प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे खेचून आणण्यात यशस्वी ठरला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या सिनेमाने ८.७१ कोटींची कमाई केली आहे.
लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या बहुचर्चित‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट २७ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. रोखठोक संवाद आणि जबरदस्त अॅक्शनमुळे यामुळे हा चित्रपट चांगलाच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
[read_also content=”‘टाईमपास ३’ चा टिझर रिलीज, २९ जुलैला साधीभोळी हृता रांगड्या लूकमध्ये भेटायला येणार https://www.navarashtra.com/movies/timepass-3-teaser-release-movie-will-release-on-july-29-nrps-286827.html”]
हा चित्रपट प्रदर्शित होऊन ३ दिवस उलटले आहेत. प्रवीण तरडे आणि गश्मीर महाजनी यांच्या मुख्या भूमिकेची जादू सर्वत्र पाहायला मिळत आहे. अनेक चित्रपट समीक्षक, प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. अवघ्या तीन दिवसात ८.७१ कोटींची कमाई केली आहे.