शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतेच ‘ई टाइम्स’शी संवाद साधला. त्यावेळी त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीची सद्यस्थिती आणि बॉक्स ऑफिसवरील चित्रपटांच्या स्थितीबद्दल काय मत आहे, असे विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘कोरोना महामारीमुळे चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे स्टारडम जवळपास संपले आहे. सेलेब्स आता ‘लार्जर दॅन लाईफ’ राहिलेले नाहीत. कोरोनाच्या संकटाने सर्वांना समान पातळीवर आणले आहे. आजकाल सुपरस्टार्सचे युग संपलेले दिसते. निवडक चित्रपट आणि स्टार्सच यशस्वी होत आहेत.
शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले, ‘आता सिनेमात जाऊन चित्रपट पाहायचा की ओटीटीवर पाहायचा संभ्रम आहे. याशिवाय कुटुंबासह सिनेमागृहात सिनेमा पाहणेही महाग झाले आहे. प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचण्याची ताकद आता स्टार्समध्ये नाही. त्यांची वैयक्तिक आणि सामाजिक प्रतिमाही डागाळली आहे.