Shefali Jariwalas Death Did Paras Chhabra Predict Her Demise Old Video Goes Viral
‘कांटा लगा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शेफालीच्या कुटुंबीयांसह इंडस्ट्रीतल्या तिच्या अनेक मित्रांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शेफाली जरीवालाच्या मृत्यूची भविष्यवाणी तिच्या एका मित्राने मुलाखतीमध्ये केली होती. शेफालीच्या कुंडलीमध्ये तिचा आकस्मिक मृत्यू असल्याचं त्याने म्हटलं होतं. सध्या शेफालीच्या मृत्यूची भविष्यवाणी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अमृता सुभाष- अनिता दातेच्या ‘जारण’ ची बॉक्स ऑफिसवर किमया, तीन आठवड्यांत सहा कोटींहून अधिकची कमाई
काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री शेफाली जरीवालाने बिग बॉस फेम पारस छाबराच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्या पॉडकास्टमध्ये पारसने केलेल्या भविष्यवाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ “फिल्म विंडो” नावाच्या फॅन्स पेजवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओमध्ये पारस शेफालीला तिच्या कुंडलीबद्दल सांगताना दिसत आहे.
शेफाली म्हणते, “भविष्य आणि अध्यात्म या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कुठे ना कुठे त्या रिलेटेड असले तरी ते वेगळे आहेत. माझ्या वडिलांना कुंडली वगैरे या गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता. मूल जन्माला येतं तेव्हा ते त्याचं भविष्य घेऊन येतं, असं त्यांचं म्हणणं होतं. जे काही होतं चांगल्यासाठी होतं. तुम्ही कोणाचं वाईट केलं नाही तर तुमचंही होणार नाही, या विचारांचे ते होते. त्यामुळे आम्ही ही त्याच विचाराने मोठे झालो. आजपर्यंत माझी कुंडली बनलेली नाही. त्यामुळे आता तू मला त्याबद्दल काहीतरी सांग”
त्यानंतर पारस छाबराने शेफालीच्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू असल्याचं सांगतो. तो म्हणतो, “तुझ्या कुंडलीत आठव्या घरात चंद्र, केतू आणि बुध हे तीनही आहेत. चंद्र आणि केतूचं कॉम्बिनेशन सगळ्यात वाईट असतं. चंद्र म्हणजे मन आणि केतूकडे फक्त शरीर आहे. त्यामुळे जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा सगळ्यात वाईट कॉम्बिनेशन असतं. आठवं घर म्हणजे हानी, आकस्मिक मृत्यू, प्रसिद्धी, तांत्रिक गोष्टी. तुझ्या कुंडलीत चंद्र आणि केतू तर वाईट आहेच. पण बुध देखील असल्याने चंद्र आणि बुध एकत्र कधीच येत नाहीत. जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा मेंदूशी रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होतात.” शेफालीच्या मृत्यूनंतर आता पारस छाबराच्या पॉडकास्टमधील हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.