फोटो सौजन्य: सोशल मीडिया
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी श्रद्धा कपूर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. श्रद्धा कपूर कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्या व्हायरल व्हिडिओमध्ये ती तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत एका लग्नाला गेली होती. अलीकडेच श्रद्धाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये ती एका लग्न समारंभाला रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं. या सोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
मध्यप्रदेशानंतर आणखी एका राज्यात ‘छावा’ चित्रपट केला टॅक्स फ्री, एकूण कलेक्श किती ?
नुकतंच श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी दोघंही श्रद्धाच्या मैत्रिणीच्या लग्नात एकत्र पोहोचले होते. दोघांनाही एकत्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्याही लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. अद्याप श्रद्धा किंवा राहुलने दोघांनीही आपल्या रिलेशनबद्दल अधिकृत रित्या भाष्य केलेलं नाही. दोघांच्याही रिलेशनबद्दल चर्चा सुरु असताना अशातच आता श्रद्धा आणि राहुल एकत्र दिसले आहेत. श्रद्धाच्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये, अभिनेत्रीनेही आणि तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंडनेही लग्नात एकत्र फोटो क्लिक केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्रद्धाच्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये, श्रद्धा कपूरने सोनेरी रंगाचा ड्रेस वेअर केला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर राहुलने लाईट ब्लू कलरचा कोट पँट आणि व्हाईट शर्ट वेअर केलेला होता. श्रद्धा कपूरच्या इन्स्टावरील एका फॅन पेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे. श्रद्धा कपूर आणि पटकथा लेखक राहुल मोदी यांच्या रिलेशनची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोघेही एकाच लग्न समारंभात एकत्र दिसल्यामुळे सीरियस रिलेशनशिपमध्ये असल्याचं दिसून येत आहे. अंबानींच्या प्री वेडिंग फंक्शनमध्येही श्रद्धा राहुलसोबत दिसली होती. आता श्रद्धा तिचं हे नातं केव्हा अधिकृत करणार ? याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.
दरम्यान, श्रद्धा कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री शेवटची राजकुमार रावच्या ‘स्त्री २’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसली होती. या हॉरर कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत २०२४ मधील अनेक रेकॉर्ड्स मोडित काढले. ‘स्त्री २’ च्या यशामुळे श्रद्धाच्या प्रसिद्धीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तसंच अफेअरच्या चर्चांमुळेही ती सतत प्रसिद्धीझोतात राहते. इतकंच नाही तर बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींपेक्षा श्रद्धाचे इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स आहेत. कमेंट्समध्ये ती चाहत्यांना अनेकदा रिप्लायही देते.