Chhaava Box Office Collection Day 29 Vicky Kaushal Movie Become Top 3 Most Earning Movie In Bollywood
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. फक्त देशातच नाही तर, परदेशातही तुफान कमाई करत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील इतर चित्रपटांचेही रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. चित्रपट रिलीज होऊन एका आठवड्यापेक्षा अधिक काळ झाला असला तरीही, महाराजांचे शौर्य आणि त्यांचे कार्य पाहण्यासाठी प्रेक्षक तुफान गर्दी करताना दिसत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असताना मध्यप्रदेश सरकारनंतर आता आणखी एका सरकारने आता महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मध्यप्रदेश सरकारनंतर आता गोवा राज्य सरकारनेही चित्रपट करमुक्त केला आहे. मध्यप्रदेश सरकारच्या पावलावर पाऊल टाकत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यामध्ये ‘छावा’ चित्रपट करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच ही घोषणा केलेली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना ही ‘गुड न्यूज’ दिली आहे. एक्स (ट्वीटर)वर पोस्ट शेअर करत ते म्हणतात,
छत्रपती संभाजी महाराज की जय!
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आणि बलिदानावर आधारित “छावा” हा चित्रपट गोव्यात करमुक्त होणार असल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे.
विकी कौशल अभिनीत हा चित्रपट देव, देश आणि धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि धैर्याचे चित्रण करतो. या चित्रपटानं गौरवशाली इतिहास पडद्यावर आणला आहे. मुघल आणि पोर्तुगीजांविरुद्ध शौर्याने लढणाऱ्या हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचं बलिदान आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
देश धरम पर मिटने वाला।
शेर शिवा का छाया था।।
महापराक्रमी परम प्रतापी।
एक ही शंभू राजा था।।
छत्रपती संभाजी महाराज की जय!
It gives pleasure to me to announce that movie “Chhava” based on the life & sacrifice of Chhatrapati Sambhaji Maharaj, will be Tax Free in Goa.
The Movie exploring the valor, courage of Chhatrapati Sambhaji Maharaj for Dev, Desh and Dharma played…
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) February 19, 2025
गोव्यामध्ये चित्रपट करमुक्त करण्यापूर्वी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही मध्यप्रदेशामध्ये ‘छावा’ चित्रपट काही दिवसांपूर्वी करमुक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा निर्णय घेतला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ कांदबरीवर आधारित चित्रपट आहे. ज्यामध्ये छत्रपती संभाजी महारांजाचे जीवन दाखवण्यात आले आहे. चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाई भोसलेंची भूमिका साकारली आहे. तर, अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात संतोष जुवेकर, शुंभकर एकबोटे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहे..