फोटो सौजन्य: भूमी पेडणेकर इन्स्टाग्राम
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या ‘मेरे हसबेंड की बीवी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्यासोबत ह्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, रकुल प्रीत सिंह आणि अर्जुन कपूर आहे. दरम्यान, हा चित्रपट २१ फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट रिलीज झाला असला तरीही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सर्व कलाकार सध्या व्यग्र आहे. प्रमोशनदरम्यान भूमीने दिलेल्या एका मुलाखतीत भारतातील महिलांविरोधात हिंसेला घेऊन स्पष्ट वक्तव्य केलं आहे. शिवाय, अभिनेत्रीने मुलाखतीत जस्टिस हेमा कमेटीच्या रिपोर्टवरही प्रतिक्रिया दिली आहे.
भूमी पेडणेकरने नुकतीच एबीपी न्यूजच्या ‘इंडिया समिट २०२५’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने बॉलिवूडमधील तिचं करिअर आणि तसंच इतर गोष्टींवर संवाद साधला. यावेळी मुलाखतीत तिला फिल्म इंडस्ट्रीत महिलांचं शोषण आणि कास्टिंग काऊचबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, “आज भारतात मला एक स्त्री म्हणून भीती वाटते. हे पुन्हा फक्त नात्यांबद्दल नाही. माझ्यासोबत मुंबईत राहणारी माझी धाकटी चुलत बहीण कॉलेजला जाते, तेव्हा मला भीती वाटते आणि ती रात्री 11 वाजेपर्यंत घरी आली नाही तर मला तिची काळजी वाटते.”
भूमि पेडणेकरनं माध्यमांमध्ये महिलांविरोधात होणाऱ्या घटनांविषयी होणाऱ्या चर्चांना घेऊन तिनं स्वत:चं मत मांडलं आहे. भूमी म्हणाली की, “जेव्हा वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर फक्त महिलांवरील हिंसाचाराच्या बातम्या येतात तेव्हा देखील ही एक समस्या जाणवते. ही काही आताची बातमी नाही. असं रोजं होतं.” भूमिनं जस्टिस हेमा कमिटीच्या रिपोर्टविषयी आपलं मत मांडलं आहे, ती म्हणाली की, “हा भारतीय समाजाचा एक भाग आहे. तिथे योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेला फॉलो करण्यात आलं आहे. ज्यातून धक्का बसेल, अशा अनेक घटनाही समोर आलेल्या आहेत.”
ताऱ्यांच्या गर्दीतील चंद्राचे तेज! ‘चमक असावी तर अशी…’ करिज्माच्या सौंदर्याचा करिष्मा
भूमी पेडणेकरने बॉलिवूडमध्ये मिळत असलेल्या असमान मानधनावर तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. भूमी म्हणते की, “जर कोणत्याही मोठ्या कंपनीची सीईओ जर एक महिला असेल तर तिला नक्कीच कमी पगार मिळेल. त्यात चित्रपटसृष्टीतील मानधनात खूप मोठा फरक आहे. यावेळी एक किस्सा सांगत भूमी म्हणाली की, ‘एका प्रोजेक्टमध्ये मला माझ्या मेल को- स्टारला मिळणाऱ्या मानधनाचा फक्त 5 टक्के भाग देण्यात आला होता. मी ही तुलना यासाठी केली की त्याची आणि माझे चित्रपट हिट असण्याचा आकडा सेम होता. आम्ही चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत होतो आणि आम्ही एकाच वेळी सुरुवात केली तरी सुद्धा त्याला जास्त मानधन मिळालं.”
भूमी पेडणेकर प्रेक्षकांच्या भेटीला ‘मेरे हसबंड की बीवी’ या चित्रपटातून येत आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांच्याही भूमिका आहे. यापूर्वी ती ‘भक्षक’ चित्रपटात दिसली होती.