So Thats Why Rishi Kapoor And Neetu Singh Had Become Unconscious On The Day Of Marriage
कपूर कुटुंबातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नीतू कपूर. आज (०८ जुलै) नीतू कपूर यांचा ६७ वा वाढदिवस आहे. नीतू कपूर यांनी वयाच्या ८व्या वर्षीच बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांची फिल्मी लव्हस्टोरी नेहमीच सर्वांच्याच चर्चेचा विषय आहे. ऋषी कपूर आपल्या लग्नाचा दिवस आयुष्यातील सर्वात मोठा दिवस मानतात. ऋषी आपल्याच लग्नात भोवळ येऊन पडले होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे. केवळ ऋषीच नव्हे तर त्यांची पत्नी नीतू सिंहसुद्धा लग्नात भोवळ येऊन पडल्या होत्या. आज नीतू यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त ऋषी यांच्यासोबतची लव्हस्टोरी जाणून घेऊयात…
“नवोदित कलाकारांना इथं मोकळेपणाने…”, प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याची निलेश साबळेसाठी खास पोस्ट
ऋषी कपूर आणि नीतू सिंह बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. ‘जहरिला इन्सान’ या चित्रपटातून ही जोडी पहिल्यांदा झळकली होती. खरं तर, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. जरीही हा चित्रपट फ्लॉप झाला असला तरीही त्यांची लव्हस्टोरी हिट ठरली. या चित्रपटामुळेच हे दोघे जवळ आले. नीतू १४ वर्षांच्या असल्यापासूनच ऋषी यांना डेट करत होत्या. हा तोच काळ होता, जेव्हा त्यांनी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. गंमतीची गोष्ट म्हणजे ऋषी कपूर सेटवर नीतू यांची जाणूनबुजून छेड काढत असे. कधीकधी नीतू त्यांना वैतागून जायच्या. त्यानंतर हळूहळू नीतू यांनी ऋषी कपूर यांची ही सवय आवडू लागली.
‘खेल खेल में’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच नीतू आणि ऋषी एकमेकांच्या प्रेमात पडले. तो चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोघांच्या प्रेमाची चर्चा इंडस्ट्रीत होऊ लागली होती. ऋषी कपूर यांना पत्नी नीतू ह्या आर. के. बॅनर्सच्या ‘बॉबी’ चित्रपटामध्ये लीड भूमिकेमध्ये हवे होते. मात्र डिंपल कपाडियाने ती बाजी मारली. खरं म्हणजे, राज कपूर यांना बॉबीसाठी नवीन आणि फ्रेश चेहरा हवा होता. त्याकाळात नीतू सिंह इंडस्ट्रीत स्थिरावल्या होत्या. त्यामुळे राज कपूर यांनी नीतू यांची निवड या चित्रपटासाठी केली नव्हती. मात्र नंतर, नीतू आणि ऋषी यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ‘रफू चक्कर’, ‘दूसरा आदमी’, ‘कभी-कभी’ आणि ‘अमर अकबर एंथोनी’ या चित्रपटातील दोघांची जोडी प्रेक्षकांना भावली.
स्वामींच्या बोरीवृक्षातून दिला जाणारा साक्षात्कार, अंगावर काटा आणणारा अनुभव
ऋषी आणि नीतू यांच्या प्रेमाचे किस्से बॉलिवूडमध्ये चांगलेच रंगू लागले होते. नीतू यांचे ऋषी यांच्या घरी येणे, जाणे सुरु झाले होते. याकाळात ऋषी यांच्यासोबतच सिनेमे करण्यावर नीतू यांनी भर दिला होता. नीतू यांना ऋषी कपूर यांच्यासोबत लग्न करायचे होते, ही गोष्ट राज कपूर यांच्यासह घरातील बऱ्याच जणांना ठाऊक होती. राज कपूर यांनी ऋषी यांना म्हटले होते, जर नीतूवर प्रेम असेल तर तिच्याशीच लग्न कर. २२ जानेवारी १९८० साली ऋषी कपूर आणि नीतू सिंग लग्नबंधनात अडकले. ऋषी आणि नीतू यांच्या लग्नाला बॉलिवूडमधील दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. त्यांचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात पार पडले होते. या दोघांच्याही लग्नात एक आश्चर्यकारक गोष्ट घडली होती.
खूद्द नीतू सिंग यांनीच ही घटना एका मुलाखतीत सांगितली होती. नीतू यांनी सांगितले की, लग्नाच्या वेळी त्या बेशुद्ध पडल्या होत्या. ऋषी कपूर यांनासुद्धा लग्नात भोवळ आली होती. लग्नात नीतू सिंग यांनी परिधान केलेला लहेंगा खूपच भारी होता. तो लहेंगा सांभाळता सांभाळता त्यांच्या नाकी नऊ आले होते. त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या होत्या. तर ऋषी कपूर त्यांच्या अवतीभोवती जमलेल्या गर्दीमुळे हैराण झाले होते. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्यांना लग्नात भोवळ आली होती. ऋषी आणि नीतू यांनी लग्नात न बोलावलेले अनेक पाहुणेही आले होते. न बोलवलेल्या लोकांनी त्यांच्या लग्नाला सूटबूट घालून उपस्थिती लावली होती. हे पाहूणे नक्की कोण आहेत, याचा अंदाजही लावणे कठीण होते. मात्र, लग्नानंतर भेटवस्तू उघडताना अनेक गिफ्ट बॉक्समध्ये दगड होते, असं देखील नीतू म्हणाल्या.