सध्या इन्स्टाग्राम सुरु करताच एकाच गाण्यावर जास्त रील पाहायला मिळात आहे. ते म्हणजे मराठमोठं गाणं गुलाबी साडी (Gulabi Sadi). सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलच ट्रेंड करत आहे. युझर्सपासून ते सेलेब्रिटींपर्यंत सगळ्यांना या गाण्यांन वेड लावलं आहे. आता हे गाणं देशापुरतं मर्यादित राहिलं नसून सातसमुद्रापार पोहेचलं आहे. गायक संजू राठोडनं (Sanju Rathod) गायिलेलं हे गाणं ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकलं आहे. या सोबतच आनंदाची बाब म्हणजे या गाण्याला ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकणा-या पहिल्या मराठी गाण्याचा मान मिळाला आहे.
[read_also content=”गायक दिलजीत दोसांझने रचला इतिहास! कॅनडातील कार्यक्रमाला प्रेक्षकांची तुफान गर्दी, ‘हा’ विक्रम केला नावावर! https://www.navarashtra.com/movies/diljit-dosanjh-makes-history-sells-out-largest-ever-punjabi-show-outside-india-details-inside-nrps-528102.html”]
काही दिवसापुर्वी गुलाबी साडी हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना या गाण्यानं वेड लावलं. विदेशातही लोकांना या गाण्याची भूरळ पडली. या गाण्याला न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकण्याचा मान मिळाला. रिपोर्ट नुसार गुलाबी साडी हे गाणं न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकणारं पहिलं मराठी गाणं ठरलं आहे.
‘गुलाबी साडी’ हे गाणं अल्पकाळात प्रसिद्ध झालं. प्रत्येकाच्या ओठीही हेचं गाणं येऊ लागलं. या गाण्याला ‘यूट्यूब’वर 70 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर ‘स्पॉटीफाय’वरही या गाण्याने 15 मिलियनचा टप्पा पार केला आहे. तसेच ‘यूट्यूब’वरील जागतिक स्तरावरच्या उच्चांक गाठणा-या व्हिडीओंमध्ये आणि ‘स्पॉटीफाय’च्या जागतिक वायरल गाण्यांमध्ये ‘गुलाबी साडी’ गाण्याचा समावेश करण्यात आला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना संजू राठोड म्हणाला की, गायक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करताना हे इतकं यश मिळेल याचा कधी विचारही केला नव्हता. अल्पावधीतच एवढं यश मिळालं यासाठी मी स्वत:ला फार भाग्यवान समजतो. आतापर्यंत माझ्या गाण्यांनी मिलियन व्ह्यूज चा टप्पा पार केला हाच आनंद माझ्यासाठी फार मोठा होता. त्यात आता न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर माझं गाणं झळकलं यामुळे माझ्या आनंदात आणखी भर पडली आहे. माझा आनंद मला शब्दांत व्यक्त करता येत नाही आहे. हे सगळं शक्य झालं ते माझ्या चाहत्यांमुळे. चाहत्यांते ऋण मी कधीही विसरणार नाही. अशीच नवनवीन गाणी मी त्यांच्यासाठी कायम करत राहीन.