Sreeleela Welcomes Baby Girl Into Her Life Says Invasion Of The Hearts
गेल्या काही दिवसांपासून सुप्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्री श्रीलीला कमालीची चर्चेत आहे. केव्हा वैयक्तिक आयुष्यामुळे तर, केव्हा तिच्या फिल्मी लाईफमुळे… अशा वेगवेगळ्या कारणांमुळे श्रीलीला चर्चेत राहिलीये. ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘किसिक’ गाण्यामुळे चर्चेत आलेल्या श्रीलीलाच्या घरी एका चिमुकलीचं आगमन झालं आहे. वयाच्या २३ व्या वर्षी सुप्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्री श्रीलीला तीन मुलींची आई आहे. अभिनेत्रीने एका चिमुकल्या मुलीसोबत सेल्फी शेअर करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेली ही पोस्ट पाहून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
२००० वर्षापूर्वी शिव-पार्वतीने लग्न केलेल्या मंदिरात गोविंदाच्या भाचीने घेतले दुसऱ्यांदा ७ फेरे!
काही तासांपूर्वीच श्रीलीलाने इन्स्टाग्रामवर त्या क्यूट मुलीसोबतचा फोटो शेअर केलेला आहे. त्या शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. वयाच्या २३ व्या वर्षी श्रीलीला तीन मुलींची आई बनली आहे. “घरात एक नवीन सदस्य सहभागी झाला आहे. या सदस्याने आमचं हृदय जिंकलंय…” असं कॅप्शन देत श्रीलीलाने चिमुकल्या मुलीसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. दरम्यान, फोटो शेअर केलेल्या मुलीला अभिनेत्रीने दत्तक घेतलंय की तिच्या कुटुंबाचीच एक सदस्य आहे, हे तिने अद्याप स्पष्ट केलेलं नाही. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून दोघांवरही प्रेमाचा वर्षाव केला जात आहे.
शेअर केलेल्या फोटोंपैकी पहिल्या फोटोमध्ये, श्रीलीला मुलीच्या गालावर किस करताना दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही हसत कॅमेऱ्याकडे पाहत असल्याचे दिसत आहे. या दोन्ही फोटोंमध्ये दोघींच्याही चेहेऱ्यावर आनंद आणि निरागसता स्पष्टपणे दिसते. सोशल मीडियावर श्रीलीलाचे हे फोटो पोस्ट होताच त्यावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. यापूर्वी २०२२ मध्ये श्रीलीलाने दोन दिव्यांग मुलांना दत्तक घेतलं होतं. गुरू आणि शोभिता अशी त्यांची नावं आहेत. एका अनाथालयाला भेट दिल्यानंतर श्रीलीलाने त्यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता.
पु. ल. देशपांडेंचं प्रसिद्ध नाटक पुन्हा रंगभूमीवर, लोकप्रिय अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत
वयाच्या २३ व्या वर्षी ती तिसऱ्यांदा आई बनल्याचं नेटकरी म्हणत आहेत. श्रीलीलाच्या या उदार स्वभावाचं चाहत्यांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं जात आहे. श्रीलीलाने तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्रीने वैद्यकीय शिक्षणसुद्धा घेत आहे. 2021 मध्ये एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण करण्याआधी तिने ‘किस’ या चित्रपटातून पदार्पण केलं. ती भरतनाट्यम डान्सरसुद्धा आहे. वैयक्तिक आयुष्यात सर्वांचे मन जिंकणाऱ्या श्रीलीलाची फिल्मी करियर वेगाने नवीन उंची गाठत आहे. अलीकडेच श्रीलीला ‘पुष्पा २’ च्या ‘किसिक’ या गाण्यामध्ये डान्स करताना दिसली. या गाण्यामुळे तिला फार मोठी प्रसिद्धी मिळाली.
अभिनेता फवाद खानला आणखी एक झटका, भारतानंतर आता पाकिस्तानने देखील ‘Abir Gulaal’ वर घातली बंदी!
श्रीलीला लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. कार्तिक आर्यनसोबत एका बिग बजेट चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते तिच्या आगामी चित्रपटासाठी उत्सुक असून चाहते तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तिचा अपकमिंग चित्रपट ‘आशिकी’ फ्रँचायझीशी जोडला आहे. दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.